सोरायसिस
सगळेच आजार किंवा रोग त्रासदायकच असतात. पण त्वचारोग जरा जास्तच! म्हणजे त्या रोगाचा त्रास तर होतोच पण त्वचेचा आजार असल्याने इतरांना सहज दिसतो आणि लोकांच्या साशंक नजरांना तोंड देणे अवघड होते. असाच एक त्वचारोग म्हणजे सोरियासिस.
आजची अटळ धावपळ, कमालीची ताण पातळी, मानसिक ताण, अनावश्यक विचार, मनाचा कमकुवतपणा, अती हळवेपणा, रात्रीचे जागरण, रात्री दह्याचे सेवन, अपथ्य, जास्त आंबट, आंबवलेल्या पदार्थांचे सेवन, फास्ट आणि जंक फूडचे सेवन, पोटात जंत असणे, खूप जास्त प्रमाणात औषधी सेवन, त्वचा संवेदनशील असणे, रक्तदोष इत्यादी कारणांमुळे सोरियासिस उद्भवतो. पण योग्य औषधोपचार आणि पथ्य यामुळे सोरियासिस बराही होऊ शकतो.
मला आठवते, काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक ४५ वर्षांची गृहिणी आली होती. त्या महिलेच्या संपूर्ण शरीरावर लाल चकत्ते होते आणि त्यावर खवले झाले होते. खाजही होती. कधीकधी त्यातून रक्तस्राव आणि पु-स्रावही व्हायचा. डोक्यात खवडा झाला होता, खूप खाज आणि सोरियासिसचे पॅच होते. संपूर्ण शरीराची त्वचा खूप कोरडी, शुष्क आणि जाड झाली होती. पूर्ण शरीरावर पॅचेस होते.
डॉक्टर म्हणून सगळे जाणून घेत असताना लक्षात आले की त्यांच्या डोक्यावर खूप जास्त ताण होता, जेवणाच्या वेळा अनियमित होत्या, जेवणाकडे साफ दुर्लक्ष होते. त्याची परिणती सोरियासिसमध्ये झाली होती. सोरियासिस पित्त दोष व उष्ण प्रकृतीमुळे होतो. आणि हा रोग बरा करायचा तर रक्त शुद्धीकरण, पित्तदृष्टि व रक्तदोष दूर करावा लागेल. त्यासाठी तशा प्रकारची उपचार योजना करावी लागेल असे मी त्यांना समजावले. पूर्ण बरे होण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा अवधी लागेल याचीही कल्पना दिली.
उपचाराला सुरुवात करताना, पहिले सात दिवस अभ्यंगम्केले. त्यावेळी जाणीवपूर्वक वर्णगणातील व कुष्ठघ्न औषधियुक्त तेलाने मसाज केले व नंतर तक्रधारा केली. यामध्ये तक्र आधी पित्तशामक औषधाने सिद्ध केले आणि त्याने तक्रधारा केली.
दुसर्या आठवड्यात, त्या महिलेला जवळजवळ ६०-७०% आराम वाटत होता. तिसर्या आठवड्यात पुन्हा तक्रधरा केली. कुष्ठघ्न तेलाने मालिश केले. काही औषधांची बस्ती दिली. यानंतर ९०% पॅचेस नाहिसे झालेले होते. जे काही छोटे एक-दोन पॅचेस राहिले होते त्यांना सात-सात दिवसांनी जळु चिकित्सा केली.
यासोबतच ७-८ महिने पोटातून घेण्यासाठी औषध दिले. त्यामध्ये महामंजिष्ठाधि काढा, पंचतिक्तघृत, मणिभद्रलेह, स्नुह्यादीलेह, सोरिया ऑईल, महातिक्तघृत, एलादि तेल, दिनेशवल्यादिकेरम, नाल्पामरादिकेरम, प्रभंजन विमर्दनम तेल इत्यादींची योजना केली. हरिद्राखंड, खदिरारिष्टम, आरग्वधारिष्टम, गोक्षुरादिगुलिका यांचा समावेश केला. या औषधांच्या सहाय्याने रक्त व पित्त दृष्टि समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा दोष नाहिसा झाल्याने त्वचेचे थर आतून भरत आले.
नाडी व दोषांची अवस्था कटाक्षाने पाहूनच औषधी व पंचकर्म यांची योजना करावी लागते. वरील उपचार योजनेचा रुग्णाला फायदा झाला. गेल्या पाच वर्षांपासून त्या महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आज त्या आनंदाने जीवन जगत आहेत.
अभ्यांतर पित्ताची व वाताची दृष्टी असल्याने पित्तासोबत रक्ताची दृष्टि असल्याने, पित्तासोबत रक्ताची दृष्टि असल्याने पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी औषधे द्यावी लागतात. महामंजिष्ठादी काढा अथवा मंजिष्ठादी काड्जा ३-३ चमचे सकाळ-दुपार-संध्याकाळ, जेवणापूर्वी कोमट पाअण्यासोबत देतात. सोबतच मंजिष्ठाअ, सारीवा, नीम, गुडुची यांचा उपयोग करतात.
गंधक रसायन २-२ गोळ्या जेवणापूर्वी, खदीर चूर्ण किंवा खदिरादि काढ्यासोबत घ्याव्या.
आरोग्यवर्धिनी गोळी स्काळ-संध्याकाळ जेवणानंतर घ्यावी.
पंचनीम्ब अथवा पंचतिक्त चूर्ण जेवणानंतर १-१ चमचा तुपासोबत घ्यावे.
खदिरारिष्ट २५ मिलि. सकाळ-दुपार-संध्याकाळ जेवणांतर घ्यावे.
आरग्वधारिष्ट ४-४ चमचे सकाळ-दुपार-संध्याकाळ जेवणानंतर देतात.
नीम्बअमृतासव ४-४ चमचे जेवणानंतर सकाळ-सुपार-संध्याकाळ घ्यावे. आवश्यकता असल्यास महातालकेश्वर रस १२५ मिग्रा. सकाळ-संध्याकाळ घेण्याचा सल्ला दिला जातो.
याशिवाय शरॊराव्र सूज असता पुनर्नवादी काढा ३-३ चमचे घ्यावा. या व्यतिरिक्त शरीरात विषाक्तता कास्त असता गोक्षुरादी गुग्गुळाचा उपयोग करावा.
आवश्यकतेप्रमाणे सोरायसिस सोबत संबंधित व्याधींचा त्या त्या लक्षणांनुसार उपचार केला जातो. सोरायसिस किती जुनाट आहे यानुसार त्याचा पुनरोद्भव संभवतो तरी पण योग्य त्या नाडी-दोष व प्रकृती व अंशाअंश कल्पनेनुसार व लक्षणानुसार योग्य चिकित्सा केली असल्यास सधारणपणे ३ वर्षात सोरायसिस पूर्ण बरा होतो.
आहार, पित्त व कफवर्धक नसावा म्हणून तळलेले पदार्थ, मीठ, आम्ल, आंबटपणा जास्त असलेले पदार्थ टाळावे. दही, मासे, आईसक्रीम याअंचा त्याग करावा. मीठ जेवढे कमी तेवढे चांगले. घ्यायचे असल्यास सैंधव मीठ घ्यावे. ताजी फळे खावी. अती थंड वातावरणात किंवा अती कडक उन्हात फिरु नये.