सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस

सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस

सर्व्हाकल स्पॉंडिलायसिस म्हणजे काय  हे अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचे म्हणजे तर मणक्यांची होणारी झीज हो . आपल्या पाठीचा कणा हा ३३ मणके मिळून बनलेला आहे .प्रत्येक दोन मणक्‍यांमध्ये गादी असते ज्याला  “डिस्क’ असे म्हणतात . ही गाडी  “शॉक ऍबर्सोर्बर’ व “बॉल बेअरिंग’चे कार्य करत असते. तर या डिस्कचा मधला भाग जेलीप्रमाणे मऊ असतो. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते.या मणक्या च्या मध्ये नसानचा समूह असतो ज्या द्वारे मस्तिष्क आणि संपूर्ण शरीराला संदेश पोहचविल्या जातो ज्याला आपण स्पाइनल कोर्ड असे म्हणतो .आणि या द्वारे शरीराच्या गती संचालित केल्या जाते .हि जर मणक्यांची कार्य रचना सुरळीत राहिली तर आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि त्यामुळे शरीराच्या हालचाली या व्यवस्थित होत असतात .

आज आपण सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस या बद्दल बोलू या …..

मान हि शरीराच्या अंग पैकी एक महत्त्वपूर्ण असे अंग .माने मुले डोके आणि मध्य शरीर जोडले जाते .तसेच डोक्याचे पूर्ण भर उचलण्याचे कार्य हि मान करत असते .माने मध्ये एकूण सात मानके असतात .

वयानुसार शरीराच्या इतर अंगाबरोबर मणक्याची पण झीज होत असते ज्याला आपण वियर अंड टियर असे म्हणतो .त्यामुळे मानके एकमेकांवर घासल्या जातात आणि त्या कारणाने स्पॉंडिलायसिस हा आजार होतो .जेह्वा मानेच्या मणक्यात झीज होऊन ते प्रभावीत होऊ लागतात तेह्वा या आजाराला  सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस असे म्हणतात .मणके हळू हळू घासून झिजत असताना त्याबरोबर त्या मधील गादी ची पण झीज व्हायला लागते त्यामुळे हाडे कमजोर होऊन ते नोकदार बनतात.मणके एकमेकां  जवळ आल्यामुळे तेथे  असणाऱ्या नसा दाबल्या जाते आणि परिणामी विविध प्रकारची दुखणी सुरु होते .तेथील  स्नायू आकुंचन पावून कडक होतात आणि त्यामुळे मानेची क्रियाशीलता कमी होते .कालांतराने  हळूहळू “डिस्क’च्या अवतीभवती नवीन कॅल्शिअम साचायला लागते व हळूहळू त्याचे नवीन हाडात रूपांतर होते. हे हाड वरून व खालून “चोची’प्रमाणे वाढते. “ज्याला आपण ओस्टीयोफाइट असे म्हणतो .

अधिक ताण ,स्थूलता ,वाढते वय ,प्रवास ,बसण्य –उठण्याच्या –झोपण्याच्या,आघात  चुकीच्या पद्धती यामुळे सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस चा त्रास होत असतो .पहिले हि समस्या ४० वर्षाच्या वयो गटात दिसून येत होती पण आज काळ च्या चुकीच्या जीवन शैली मध्ये हा त्रास कमी वयामध्येच सुरु होत असल्याचे दिसून येते .

मानेत दुखणे ,मान लागणे किंवा जखडल्या प्रमाणे वाटणे ,डोके दुखणे ,चक्कर येणे ,हाताला मुंग्या येणे किंवा बधीर झाल्या प्रमाणे वाटणे ,अंस संधीत दुखणे ,मानेची हालचाल केल्यास दुखणे अधिक वाढणे  हि लक्षणे सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस मध्ये दिसून येतात .कधी कधी खांद्यापासून कळ अथवा मुंग्या सुरू होऊन दंडात व हातात पसरतात. आणि ही कळ असह्य अश्या स्वरुपाची असते .  दंड, हात किंवा तळहातातील स्नायूंची शक्ती कमी झाल्याने काही समान उचलताना किंवा लिखाण काम करताना त्रास होतो .  अधिक वेळ उभे राहिले असता ,किंवा अधिक बसले असता ,किंवा शिंका आल्याने ,हसल्याने ,खूप खोकालाल्याने ,अधिक चालल्याने मानेचा त्रास वाढल्या जाते .

कधी कधी मानेतील मणक्‍यातून बाहेर पडणाऱ्या नसेवर दाबपडल्याने दुखणे हे एका बाजूलाच असते त्यामुळे एका बाजूची मान, खांदा दुखते.

आयुर्वेदात या व्याधी चे ग्रीवा स्तंभ या नावाने वर्णन आले आहे .

आयुर्वेदिक चिकित्सा

अभ्यंगम –विशिष्ट परिणामकारक तेलाच्या सहाय्याने मसाज केल्याण्याने तेथील नाडीनां पोषण मिळते ,रक्तसंचार वाढते आणि दुखणे सुद्धा कमी होते .

पोट्टली मसाज –विशिष्ठ औषधी द्रव्याचा एरंड ,निर्गुंडी ,मुंगाना ,अर्क ,धत्तुर पत्र या सारख्या वात्नाषक द्रव्यांचा पोट्टली बवून मसाज केल्याने पाठीच्या कण्या ला बळकटी मिळते आणि तेथे जे पण काही घटक बदल घडून आल्याने सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस झाला आहे ते ठीक केल्या जाते

मन्या बस्ती –वातनाशक तेलाच्या वापर करून हि क्रिया केली जाते यामुळे तेथील स्नेह द्रव्य वाढते आणि दोन काशेवृका मध्ये होणारे घर्षण थांबते .तसेच सूज देखील कमी होते .तेथील मांस पेशींना बाल मिळते .व माने मधील मानके मजबूत आणि टनक बनतात

नवराकिडी –नवराकिडी हणजेच rice massage .यामुळे नाडी तत्रिका जिवंत होतात ,त्यांचे पोषण होते आणि त्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत मिळते .दोन मणक्या मधील गादी चे पुअनर्भवन सुद्ध्या होते .

नस्य –नाकातून तेल टाकणे या क्रियेला नस्य असे म्हणतात .नाकातून टाकलेले तेल हे डोक्यात जाऊन शरीरातील विष द्रव्ये बाहेर टाकतात आणि नाडी तंतुना stimulate करतात .

बस्ती-हि वाताशामानाचे काम करते तसेच शरीरातील विष द्रव्ये सुद्धा बाहेर काढते .हाडे मजबूत होतात ,मणक्यांना बल मिळते .बस्ती द्वारे औषध हे पक्वशायात सोडल्या जाते ज्यामुळे लवकर परिणाम मिळते .

याबरोबर योगराज गुग्गुळ,वात  विध्वंस रस ,समीर पन्नग ,लाक्षादी गुग्गुळ ,प्रवाळ पंचामृत रस ,अस्थी –मज्जा पाचक योग ,पुनर्नवा गुग्गुळ ,बलारीष्ट ,अमृतारीष्ट ,दास्मुलाडी काढा यासारख्या औषधी कल्पचीउपाय योजना केल्यास उत्तम लाभ मिळतो .

आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म यांची योग्य जोड मिळाल्याने सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस चा आजार हा काही हफ्त्यातच बरा होतो.मसाज द्वारा विकृती ठीक करणे ,बाहेर निघालेल्या हाडांना स्वस्थानात स्थापित करणे ,तेथील नाडी तंतुना पोषण व बल प्रदान करणे,पाठीच्या कणा मधील हाडे मजबूत करणे ,त्यांची झीज भरून काढणे ,मांसपेशी न स्थिरता प्रदान कारण आणि दोन मणक्या मधील गादी चे पुनर्भावन करणे हे शक्य होते केवळ पंचकर्माने.

 

1 comment

  1. sdsad

    आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म यांची योग्य जोड मिळाल्याने सिर्व्हाकल स्पॉंडिलायसिस चा आजार हा काही हफ्त्यातच बरा होतो.मसाज द्वारा विकृती ठीक करणे ,बाहेर निघालेल्या हाडांना स्वस्थानात स्थापित करणे ,तेथील नाडी तंतुना पोषण व बल प्रदान करणे,पाठीच्या कणा मधील हाडे मजबूत करणे ,त्यांची झीज भरून काढणे ,मांसपेशी न स्थिरता प्रदान कारण आणि दोन मणक्या मधील गादी चे पुनर्भावन करणे हे शक्य होते केवळ पंचकर्माने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Signup For Parijatak Latest Newsletter

Subscribe to the Parijatak Latest Health Newsletter and get regular updates on Dr.Nitesh Khonde latest health Tips, videos, health & wellness, blogs and lots more.

  • Newsletter

    Sign up for regular updates & upcoming events

Top