sleep-paralysis

व्यंध्यात कारणे

काही दिवसापूर्वी  क्लिनिक मध्ये श्री दिलीप व सौ अनिता पाटील आले .हे जोडपे लग्न झालापासून च मुल व्हावे या प्रयत्नात होते पण लग्नाच्या ५ वर्षानंतर देखील त्यांना मुल झालेले नव्हते . यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न ,सर्व तपासण्या ,ट्रीटमेंट देखील घेतले पण शेवटी निराशाच हाती पडली . अखेर त्यांनी मुल adopt करायचे ठरविले. मग कोणीतरी त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती बद्दल माहिती दिली व ते माझ्याकडे आले .त्यांची कारणे ,लक्षणे इ तपासून मी त्याच्या चिकित्सेला सुरुवात केली .

आज Mr व Mrs Patil सारखी कितीतरी जोडपे या वंध्यत्व सारख्या problems सोबत झुंजत आहेत .

व्यंध्यात कारणे

 • जन्मजात विकृती– गर्भाशय लहान असणे किंवा बीजग्रंथ लहान असणे किंवा नसणे ,गर्भाशय रचना विकृती
 • सागोत्रीय विवाह
 • अपथ्यकर आहार विहार
 • स्थौल्यापणा
 • राजःस्वला परिचर्या न पाळणे
 • बिज्ग्रन्थी दोष PCOD
 • शारीरिक विकृती –पांडुरोग ,मुळव्याध ,वारंवार होणारे urine infection ,ग्रहणी इत्यादी
 • हार्मोन चे असंतुलन
 • उशीरा लग्न होणे
 • मानसिक तान ताणाव
 • गर्भाशय कमजोर असणे
 • गर्भावाहीन्या बंद असणे – fallopian tube block
 • Ovulation न होणे
 • गर्भाशयाचा आतील layer व्यवस्थित तयार ना होणे
 • गर्भौत्पना साठी आवश्यक असणारे घटक
 • ऋतू –म्हणजे fertile period
 • क्षेत्र –गर्भाशय
 • बीज –स्त्री बीज व पुरुष बीज
 • अम्बु –blood supply n nourishment supply
 • हे सर्व प्राकृत असेल तर होणारे मुल देखील प्राकृत असते म्हणून गर्भाधाना पूर्वी शरीर शुद्धीकरण कारणे आवश्यक असते .पंचाकार्माने एकदा शरीर शुद्ध झाले कि तयार होणारे बीज हे उत्तम दर्जाचे असते परिणामस्वरूप होणारे मुल देखील उत्तम गुणाचे असते. तसेच कितीतरी अनुवांशिक विकार देखील आपल्याला गर्भ संस्काराने टाळता येतात .

उपचार

 • आहार हा नेहमी षडारासात्मक असावा
 • आहार हा सात्विक असावा त्यामुळे शरीर व मन प्राकृत राहते
 • व्यायाम व प्राणायामामुळे शरीराद्वारे औक्सिजन मोठ्या प्रमाणात शोषल्या जातो परिणामस्वरूपी nervous system,endocrine system ह्या activate होतात .
 • ओमकार,कापलभाती,भ्रस्थिका या सारखे प्राणायाम गर्भाशयावर कार्य करतात तर अनुलोम विलोम ,हलासना ,मास्त्यासना हे thyroid वर कार्य करतात
 • आहार पचन क्रिया हि प्राकृत असणे हे गरजेचे आहे कारण रजः म्हणजे mentrual flow हा आहार रसा पासून तयार होतो .
 • मनाचा देखील संबंध व्यंध्यात्व शी येतो म्हणून मन प्राकृत ठेवणे गरजेचे असते.त्यासाठी ध्यान धारणा कारणे उत्तम ठरते.
 • स्थौल्य पाना कमी करणे . वमन व विरेचन  मुळे स्थौल्य पाना कमी होतो .तसेच  चंद्रप्रभा वाटी ,कैशोर गुग्गुळ ,त्रिफळा गुग्गुळ इ वापर करणे .
 • शारीरिक विकृती असल्यास प्रथम त्याची चिकित्सा करणे .
 • गर्भाशया हा मूत्राशय व मलाशय यामध्ये स्थित असतो .त्यामुळे दीर्घ कालीन मलबद्धता किंवा मूत्रविकार यामुळे देखील गर्भ धारणा होत नाही मानून प्रथम त्याची चिकित्सा करणे .
 • रजः हा राक्तास्वरूपी शरीरामध्ये असतो म्हणून रजः दुष्टी साठी विरेचन व रक्तमोक्षण करणे .
 • fallopian block मध्ये पात्रापोत्तली व उत्तरबस्ती चिकित्सा कारणे .
 • गर्भाशय हे कटी भागी असतो .कटी हे वाताचे स्थान आहे व त्यावरील परम चिकित्सा  म्हणजे बस्ती
 • प्रतेक मध्ये व्यंध्यात्वआ ची कारणे हि वेगवेगळी असते व खरा वैद्य तोच ठरतो जो त्या करणान ना ओळखून त्यावर योग्य ती चिकित्सा करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Signup For Parijatak Latest Newsletter

Subscribe to the Parijatak Latest Health Newsletter and get regular updates on Dr.Nitesh Khonde latest health Tips, videos, health & wellness, blogs and lots more.

 • Newsletter

  Sign up for regular updates & upcoming events

Top