लहान बाळास बाळघुटी

लहान बाळास बाळघुटी

लहान बाळास बाळघुटी घालीत असले म्हणजे कसल्याही प्रकारचे बालरोगांपासून उपद्रव होण्याचे टळतात. यास्तव बाळघुटी घालणेची ती योग्य रीतीने घालावी. ही वहिवाट पूर्वीपासून आमच्या समाजात होती. पण आता जाहिरा- तीची औषधे दिल्याने गुण न येता पैसे व्यर्थ जातात.

१. तीन महीन्यांच्या आतील मुलास घुटी- जायफळ, मायफळ, पंजाबीसालंमिश्री, कवचबीज, अतिविष, दालचनी, बदाम- सर्व अंगावरील दुधात उगाळून रोज चाटवावी.

२. आई मेलेल्या मुलास पौष्टिक- पंजाबी सालंमिश्री, आसकंद, दालचिनी, प्रत्येकी ३।३ वळसे शेळीच्या किंवा गाईच्या दुधात उगाळून देणे.

३. गोरोचन १। तोळा, जायफळ -1- तोळा पत्री, -1- तोळा, लवंग -1- तोळा, दुदवळे -2- तोळा, तुळशीची पाने -2- तोळा, विड्याचे काळे पान -2- तोळा, पेरामुठी -2- तोळा सर्व उत्तम खलन गुंजप्रमाण गोळ्या कराव्या. एक विक रोज दाईच्या किवा आईच्या दुधात उगाळून द्यावी.

४. वेळादाणे, पत्रज, तेज, नाकेशर, त्रिकट, आसकंद, कोहळा, जिरे, हिरड्याचे बी, समभाग वस्त्रगाळ करून सब यात दुप्पट साखर घालून वयमान पाहून मधातून ३ माल सन ८ गंजांपर्यंत देणे. सर्व रोग जातात. अग्निवद्धी जेष्ट होऊन मुले पुष्ट होतात.

५. अगदी लहान बाळास- वावडिंग, बाळहिरडा, अति- विष मधात उगाळून चाटवावे.

६. शिशुकल्याण चूर्ण- येरंड्या सोलून, रुईच्या मुळा- वरील साल, अतिविष, काकडशिंगी, पिंपळी, धणे, अडुळशाचे मूळ सर्व समभाग घेऊन, चूर्ण करून, त्यासमान साखर घालून १ पासून ३ मासेपर्यंत वयमान पाहून द्यावे. म्हणजे सर्व ज्वर, खोकला, तरळ, श्वास, अरुची वगैरे इद्र रोग जातात.

७. सापसंधीचे पाळ, गजगा (भाजून), काळा बोळ, अतिविष, वावडिंग, डिकेमाली, काडेचिराईत यांच्या पाण्यात किंवा अंगावरले दुधात ३।३ वळसे उगाळून मध घालून चाटवावे. म्हणजे बाळाचा ज्वर, जंत, खोकला, पोट दुखणे वगैरे विकार जाऊन शौचास साफ होते.

८. वावडिंग, इंद्रजव, सैंधव मधात उगाळून अगदी लहान बाळास चाटवावे.

९. संठ, पिंपळी, मायफळ, अजमोदा, सुरवारीहिरडेदळ, वेखंड ही प्रत्येकी १।१ तोळा ; बेहडेदळ, मुरडशेंग हळकुंड गलाबकळी, लवंगा, जायफळ, नागरमोथे, लकडीरेवाचिनी, कडकारळे, सापसंदीचे पाळ, जेष्ठमध, काडेचिराईत, पळसपापडी, ही प्रत्येकी अर्ध अर्ध तोळा, कुटकी, दालचिनी, जायपत्री, गजग्याची बी भाजून, खरवतीचीसाल, ओवा, प्रत्येकी २।२ मासे, वावडिंग २ तोळे या सर्वांचे वस्त्रगाळ चूर्ण करून गोमूत्रात ३ दिवस खलून गुंजप्रमाण गोळ्या कराव्या. एक गोळी अंगावरील दुधात किंवा गाईच्या दुधात उगाळून द्यावी. सहा महिन्यांपर्यंत १ गोळी पुढे १ वर्षपर्यंत २ गोळ्या द्याव्या. तीन वर्षेपर्यंत कारणपरत्वे ३ गोळ्या द्याव्या. याने मुलाची प्रकृती चांगली राहाते व मृल निरोगी होते.

१०. बाळघुटी २ री – नागरमोथे, सुंठ, मिरे, पिंपळी, बेलफळाचा गर, लवंगा, इंद्रजव, अतिविष समभाग घेऊन वस्त्रगाळ चूर्ण करून निबरसात खलून गोळ्या कराव्या. राज १ गुंजप्रमाण गोळी लहान बाळास मधातून किंवा गावरील दुधातून द्यावी. ज्वर, खरूज, डबा, जंत, इत्यादी विकार होत नाहीत. आठ महिन्यांपुढे २ गुंजाप्रमाण व दीड वर्षापुढे ३ गुंजाप्रमाण असावे.

११. बालकाच्या सर्व रोगांवर काढा – काडेचिराईत, सबजा, पुदीना, गजगा, महाळुगाच्या झाडाची साल, डिके-माली, कलमकार, वावडिंग, हिरडा, बेहडा, आवळकाठी, जेष्ठमध ही औषधे एकेक तोळा घेऊन कुटून ४० तोळे पाणी घालून ५ तोळे उरेपर्यंत कढवून गाळून कुपीत भरून ठेवावा. दर खेपेस १ तोळा काढा घेऊन पाव तोळा किंवा २ मासे मध घालून द्यावा. दि. ७. म्हणजे सर्व रोग जातात. हा काढा महिन्यातून ३ दिवस तरी द्यावा. म्हणजे रोग होण्याची मुळीच भीती नाही. मातेचे दूध न मिळाल्यास गाईचे किंवा शेळीचे द्यावे.

१२. सुरवारी हिरडा- बेहडा, अतिविष, नागरमोथे, इंद्रजव, वावडिंग, अक्कलकार, जेष्ठमध, बाहाव्याच्या शेंगेतील मगज, जायफळ, मायफळ, सुंठ, पुनर्नवा, किराईत, कुटकी, टाकणखाराची लाही हे जिन्नस ऊन पाण्यात अगर अंगावरले दुधात उगाळून १ बोंडलेभर मुलास पाजावे. बहतकरून रात्री पाजण्याचा पाठ आहे. हयाने ज्वर, अति-सार, जंत, श्वास, काम, आमांश, किरकोळ उपद्रव, पोटफुगी, जाऊन मलमूत्र साफ होते. खरूज, कंडू, पैण व पोटातील इतर विकारही जातात. अन्न खाणाऱ्या मुलास वरील औषधांचे चूर्ण करून ३ पासून ६ गुंजाभार घेऊन दुधा-तून द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Signup For Parijatak Latest Newsletter

Subscribe to the Parijatak Latest Health Newsletter and get regular updates on Dr.Nitesh Khonde latest health Tips, videos, health & wellness, blogs and lots more.

  • Newsletter

    Sign up for regular updates & upcoming events

Top