टाचेच दुखणे

टाचेच दुखणे व यात्रेत, चालण्याच्या, धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होताना मुख्यत्वे ही काळजी घ्यावी

शरीरामधील पाऊल हा एक महत्त्वाचा अवयव आहे. ह्यामुळेच टाचेच दुखणे म्हणजे नेमके काय समजून घेऊ , एक पाऊल यशाकडे, विजयाची पाऊलवाट या शब्दांमधून आयुष्याच्या वाटचालीतील पावलांचे महत्त्व अधोरेखित होत असते.

लिगामेन्ट, टेन्डॉन आणि बोन्स यांना मिळून बनलेल्या पायाच्या रचनेने आपल्या शरीराचे वजन उचलून धरले असते. एखाद्यावेळी पायचे हाड वाढून दुखते. टाचा ठणकतात. खूप चालणे झाले तर पोटऱ्या आणि पावले ठसठसू लागतात. टाचेच्या दुखण्याकडे अनेकांचे हमखास दूर्लक्ष होते. कामाच्या रगाड्यात दुखऱ्या गुडघ्यांनाही आपण पूढे रेटत नेतो. कोणतेही दूर्लक्ष गंभीर वळण घेऊ शकते. अशावेळी वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. दक्षता हाच योग्य उपाय हा मंत्र कायम लक्षात ठेवावा.

कोणत्याही यात्रेत किंवा चालण्याच्या, धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होताना मुख्यत्वे ही काळजी घ्यावी-

 • उन्हातान्हात खूप चालणार असू तर सोबत कांदा ठेवावा. कांद्यामुळे थकवा कमी येतो. मूर्च्छा येण्याची शक्यताही क्षीण होते.
 • गुळ शेंगदाणा चिक्की, पेपरमिन्ट, चॉकलेट्स, ग्लुकोज, इलेक्ट्रॉल पावडर आणि खाण्याचे हलके पदार्थ सोबत ठेवावे.
 • चालून थकलेल्या पावलांसाठी थंड किवा गरम पाण्याने दिलासा मिळतो. थकलेली पावले सैधव मीठ घातलेल्या पाण्यात ठेवल्यास थकवा लवकर उतरतो.
 • थकव्यामुळे पाय ठणकत असल्यास महानारायण, तिळाचे, सरसोच्या तेलाची मालीशही उपयुक्त ठरते. वात कमी होण्यास असा तेलांची मदत होते.
 • दुखणाऱ्या गुडघ्यांना आम्ही आयुरिवेदिक केंद्रांमध्ये तिळाच्या तेलाची मालीश करतो. पिचू करतो.  त्यावर नंतर सुंठ किव्वा कलमीचा (दालचिनी) लेप लावता येईल. लेप कोमट पाण्यातलावावा १५ मिनिटापेक्षा अधिक वेळ ठेवू नये. अन्यथा लाल चट्टे पडण्याची किंवा आग होण्याची दाट शक्यता असते.
 • नेहमी पायाची मालीश हृदयाच्या दिशेने करावी. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते. ते शक्तीप्रद असते. वात कमी होण्यास मदत होते.
 • डोळ्यांची आग होत असतानाही तळपायाची तेलाने मसाज करावी. अशावेळी मर्म किंवा पंचकर्म चिकित्सेचा फायदा अधिक असतो.
 • उन्हात फिरल्याने अधिक थकवा येतो. एखाद्यावेळी संधीवातानेही पाय दुखतात. अशावेळी सुंठीचा काढा करावा. त्यात २० ते ३० मिली एरंड तेल टाकावे. हे मिश्रण रात्री झोपताना प्यायल्याने सांधेदुखी विशेषतः संधिवात, आमवातात काही दिवसातच आराम पडतो.
 • अनवाणी चालल्याने आलेला थकवा घालविण्यासाठी लांब श्वास घ्यावा. अनुलोम, विलोम आणि प्राणायामाचाही फायदा होतो. शक्य असल्यास दशमूळ काढ्याचा स्वेदघ्यावा.प्रभंजनविमर्दनम तेलाने पायाची मालिश करावी.
 • श्रम करणारे कार्य असेल तर पूर्वकाळजी म्हणून शतावरी सिध्द दूध घ्यायला हवे. अश्वगन्धारीष्ठ, बलारिष्ठ, कौंच गुलिका इ. घ्यावेत.
 • हिंगाची पुडी वा कापराची पुडी सोबत बाळगावी. श्वास-उच्छ्वास घेण्यास होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
 • पायी चालताना मुर्च्छाना आली तर थंड पाणी पूर्ण चेहऱ्यावर व तोंडावर शिंपडावे.
 • एखाद्याला रक्तदाबाचा त्रास असल्यास हरीतकी चूर्ण तीन दिपसांपूर्वीपासून रात्री कोमट पाण्यासह घ्यावे. खस व चंदन सिद्ध पाणी पिण्यासाठी न्यावे.
 • अभ्यंगम व स्वेदन केले असता पूर्ण शरीरातील थकवा निघतो. शरीरास पुनरुज्जीवित केल्यागत नवउर्जा देण्याची शक्ती त्यातून मिळते.
 • नेहमी पोटऱ्या दुखत असल्यास पोट साफ होते आहे काय याची चाचपणी करावी. करंज, धोतरा, एरंड, निर्गुंडी, आक, मोरिंगा, चिंच आदींचा उपयोग करून केलेली पोत्तली मसाजत्यासाठी उपयुक्त ठरते.
 • Varicose vein असता जालौका (जळू) लावाव्यात व दुष्ट रक्त बाहेर काढावे. शक्य असल्यास गंधपुरा तेल सोबत ठेवावे. टाचेच दुखणे कमी होण्यास मदत होते.
 • थकलेल्या अवस्थेत गटागटा पाणी पिऊ नये. त्याचे दुष्परिणाम होतात. पाणी सावकाश आणि शक्यतो बसूनच प्यावे.
 • कोकम , लिंबूपाणी , पन्हे जवळ बाळगावे. मोठी पायी यात्रा करताना नारळपाणी वा ताक पिणेही उपयुक्त ठरते.
 • शक्यतो पेहराव कॉटनचा सावा. त्यामुळे घाम शोषण्यास मदत होऊन शरीर थंड राहते.
 • रात्री अश्वगंधा सारखे औषध घ्यावे. त्याने गाढ झोप लागते.
 • सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे झोप येण्याची. कुठल्याही पदयात्रेपूर्वी आणि नंतर पूर्ण झोप होईल याची काळजी घ्यावी. गाढ झोपेमळे थकवा पळतो.  झोप झाली तर मन प्रसन्न राहते. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ हे नव्याने सांगायची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Signup For Parijatak Latest Newsletter

Subscribe to the Parijatak Latest Health Newsletter and get regular updates on Dr.Nitesh Khonde latest health Tips, videos, health & wellness, blogs and lots more.

 • Newsletter

  Sign up for regular updates & upcoming events

Top