कोरोना काळजी

कोरोना काळजी घ्यावी घरी काय काय करावे

 • कोरोना काळजी मध्ये दररोज सकाळी 30 मीनीटे प्राणायाम करावा कमीत कमी प्राणायाग करताना इडा आणि पिंगला नाही म्हणजे डाव्या आणि उजव्या नाडीचा क्रमाक्रमाने उपयोग करावा .
 • डाव्या नाडीने म्हणजे चन्द्र नाडीने श्वास घेतल्यास शरीरात शितलता वाढते व मनाची ताकत वाहून डोक शांत होऊन झोप शांत होण्यास मदत होते. तसेच उजव्या म्हणजेच सूर्य नाडीने श्वास घेतल्यास शरीरातील उर्जा वाढते व जांभई किवा काम करण्याची इच्छा न होणे असे प्रकार थांबतात. डाव्या नाकपुडीने श्वास घेता तेव्हा तो उजव्याने बाहेर सोडावा व श्वास घेताना तो जेवढा हलुवार पणे घेता येईल तेवढा घ्यावा की जेनेकरून नाका समोर ठेवलेला धागा सुध्दा हलु नये त्याने मनावर विजय मीलतो तसेच भ्रामरी, भस्त्रीका सारख्या प्राणायामाने शरीरातील विशेषतः फुफ्फुसातील कफ कमी करून फुफ्फुस  संस्थानाला मजबूत करण्यात मदत होते.
 • आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोरोना चा प्रत्यक्श  संबध फुफ्फूसाशी आहे त्यावळे अनुलोम विलोम, भ्रामरी भस्त्रीका सकाळी व संध्याकाळी कमीत कमी २० ने 30 मीनीट करावी
 • तसेच झोपतानाही दिर्घ श्वासासह अनुलोम विलोम + ॐकार जप करत झोपावे रोगप्रतिकार शक्ती वाढून खुप फायदे होतात, व कोरोना काळजी घेतायोगा – कमीत कमी दररोज घरामध्ये सकाळी 30 ते 45 मीनीटे कोरोना काळजी घेेेत असताना योगासने करावीत जेणेकरून आज आपन घराबाहेर निघु शकत नसल्यामुळे व शतपावली व morning walk करु शकत नाही महणुन आपले योगासने जास्तीत जास्त करावी जेणेकरून मनाचा व शरीराचा ताण कमी करून शारीर स्वास्थ राखण्यास मदत करता येईल
 • शवासन – दिवसातुन 10 ते 15 मीनीटाचे र
 • एकदा शवासन करावे व सोबतच योग निद्रा पण करावी हे करत असताना पायाच्या बोटापासून एकाएका अवयवावर लक्ष केंद्रीत करून त्या अवयवास Relax करत जावे म्हणजे हळुहळु पायांची बोटे टाचा गुल्फसंधी, जानु संधी , पोटर्या, मांड्या,
 • कमर ,पाठीचा मणका , पोट, छातीचा भाग दोन्ही हात, पंजे व बोट, कुर्पर संधी, अंस संधी, ग्रीवा संधी, ओठ, नाक , डोळे, कान, डोक, भ्रुमध्य अस्यावर लक्ष केद्रींत करून Relax करावे याने योग निद्रा व शवासन एकत्र होते मनोशारीरीक स्वास्थ वाढून रोगप्रतीकार शक्ती वाढते. कोरोना काळजी घेता येते.
 • – Biological Clock
 • – स्वताची झोपण्याची, सकाळी उठल्याची, व्यायामाची आघोंळीची, जेवनाची व सगळ्या गोष्टीची वेळ निश्चीत करुन दररोज त्या प्रमाणेच वागावे अन्यथा तुमची शारीरीक रोगप्रतीकार शक्ती कमी होऊ शकते म्हनुनच Biological clock ठरवून तसाप नित्य नियम पाळावा .
 • • जेवनामध्ये फायबर फुड चा उपयोग करावा.
 • – त्रिफळा चुर्न शक्य असल्यास नित्य नियमाने रात्री
 • झोपतवेळी १ च. गरम पाण्यासह घ्यावे  हयाने
 • तिनही दोष व्यवस्थीत राहून अनुलोमनाने पोट साफ राहते व अजीर्ण होत नाही.
 • शक्य असल्यास भाजीपाला बाहेरून आणू नका, अन्यथा आयुष्याचा भाजीपाला होण्याचा धोका राहील
 • दुध सुद्दा बाहेरून आणु नका
 • -प्रत्येक १ तासाने साबनीने अथवा – Liquid Soap ने हात धुवावे.
 • – दररोजचे सकाळीचे व रात्रीचे दोन्ही जेवण हलके ठेवावे कारण आपल्या शारीरीक कोणतेही विशेष काम नसल्यामुळे आपले पचन कमी होत आहे व त्यामुळे गॅसेसचा त्रास , मलावष्टंत्राचा जाम, पोटफुगा-याचा त्रास, चिडचीड वाढत चालली आहे.
 • सोबतच जेवढे हलके अन्न आपण खाउ तेवढी आपली पचन शक्ती चांगली राहील व पचन शक्तीचा म्हणजेच जाठराग्नीचा सरळ संबध तुमच्या रोग प्रतीकार शक्तीशी आहे आणि म्हणूनच साथीच्या रोगामध्ये रोगप्रतीकार शक्ती चांगली राहावी म्हणून शक्य तसे लंघन करायला सांगीतले आहे.
 • अन्न कमी प्रमाणात व गरमा गरम तसेच
 • सुपाच्य मसाले युक्त ज्यात दालचीनी, मीरे
 • आद्रक, लसून, मेथी, खसखस, विलायची,
 • जीरे, कर्णफुल , तेजपान ,मोठी विलायची लवंग इत्यादी चा उपयोग करावा ह्याने जाठराग्नी प्रदिप्त होऊन रोगप्रतीकार शक्ती वाढते पिण्यासाठी वापरयात येणारे पाणी हे गरम अथवा गरम करुन थंड केलेले वापरा त्याने अग्निवर्धन होऊन रोगप्रतीकार शक्ती वाढते व कोरोना काळजी घेता येतेेे..
 • – फ्रीजच्या वस्तु व फ्रीजचा वापर टाळावा याने अग्निमांद् होते.
 • -AC वापरू नये (शक्यतो)
 • – घरामध्ये Books वाचावे में आध्यात्मीक अन्यधा Positive thoughts वाढवणारे विरंगुळा करणारे असतील. मोठे चरीत्र, कथा, कादंबर्या वाचाव्यात यामुळे दिवस सहजपणे डोके शातं ठेवून उपयोगात आणता येईल
 • सकाळी- तुलसी, दालचीनी, अद्रक व विलायचीचा चहा प्यावा, शक्यतो ग्रीन टी घ्यावा
 • – दररोज सांयकाळी 5 ते 6 च्या सुमारास सुठं(आर्द्रक) कलमी, धने, जिरे,इलायची, लवण चा काढा करून चहासारखा घ्यावा (ह्यात सुंठ, मिरे, पिपंळी घातली
 • तर अतीउत्तम ह्यालाच त्रिकटू  म्हणतात भरपुर राज्यात त्रिकटू Preventive medicive and currative medicine म्हणुन वापरणे चालु झाले आहे )
 • – दोन वेळा आंघोळ करावी.
 • – आपणास आतापर्यंत कामाच्या व्यापामुळे परिवारास पुर्ण वेळ देता आला नाही. हया मिळालेल्या वेळेचा पुर्ण सदउपयोग करावा करिता आपल्या आई वडीलाना डोक्याची मसाज, पायाची मसाज साध्या तिळाच्या तेलाने कींवा खोबरेल तेलाने अथवा सरसो च्या तेलाने करावी अथवा घरात महानारायण किंवा सहचर तेल असेल तर – अतीऊत्तम.
 • दररोज नाकामध्य साधे तीळाचे ,खोबरेल तेल किवा जात्यादी तेल नाकामधूये दोन दोन थेंब टाकावे किवा साधे गाईचे तुप टाकले तरी चालेल ह्याने नाकातून
 • संसर्ग होण्याचे शक्यता कमी होईल व कोरोना काळजी घेउ.
 • रक्षोघ्न गण त्यांची घरामध्ये धुप ध्यावी दररोज
 • – अगर शिरीष बीज/पत्र, सर्षप, वचा, लवण, सर्जक्षार , निमपत्र, घृत, कर्पुर, हिंग, गुगुल, राळ
 • -हे नसल्यास साधी राळ अथवा कापुर जाळला तरीपण चालेल
 • -ताप असल्यास व सर्दी खोकला असल्यास
 • – मृत्यूंजय रस – १ गोळी सकाळ संध्याकाळ
 • – महामृंगाक रस – १ गोळी सकाळ संध्याकाळ
 • OR
 • – संशमनी वटी – २ गोळी सकाळ संध्याकाळ
 • – लक्ष्मीविलास रस – १ गोळी सकाळ संध्याकाळ
 • OR
 • -श्वासकुठार रस. –  १ गोळी सकाळ संध्याकाळ
 • -त्रीभुवन कीर्ती /  जयमंगल रस –  १ गोळी सकाळ संध्याकाळ
 • – रसासिदूर खडीसाखरेसोबत  सुक्ष्म करून घ्यावे
 • ४०gm रवडीसाखर घेऊन २  gm रससिंदूर घेऊन
 • त्याचा १ तास खल करून ६०  पुड्या करून १-१
 • पुडी सकाळ संध्याकाळ पूष्करमुळाच्या काढ्यासह
 • घ्याव्यात.
 • पुष्करमुळ , भारंगी, रिगंणी, गुळवेल वासा
 • व त्रिकटू (सुंठ, मिरे, पिंपळी) चा काढाकरून
 • सकाळ संध्याकाळ १५ – २० ml घ्यावा.
 • हयाने खोकला, कफ, श्वास, सर्दी व ताप जातो.

ह्याआधी १९१८ मध्ये संप्टेबर महीन्यात इन्फ्लुइन्झा
ची साथ आली होती ती डीसेंबर महीन्यापर्यंत चालली
त्यामध्ये भारतात लाखों लोक मृत्युमुखी पडले, परंतु
ह्या औषधांनी खुप चांगले परिणाम दिलेत हे
सर्व काही नमुद आहे. त्यावेळी पण chloroquine
चा खुप मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला होता,
पंरतु आयुर्वेदीक औषधांनी जे परिणाम मिळालेत
ते कशानेही नाही.

त्या काळी वापरलेली औषधी –
१.  निम साल १.२ ग्राम + रिगणी भाग ०.६ ग्राम + काडेचिराईत ०.3 ग्राम + सुंठ ०.3 ग्राम  +मिरे ०.3 ग्राम + बडीशेप ०.3 ग्राम + ओवा  ०.3 ग्राम + पित्तपापडा ०.3 ग्राम + वावडींग  ०.3 ग्राम ह्याच्या काढ्यात गुळ मिसळुन प्रत्येक तीन तासाला १५ ते २० मि.ली दिले गेले.
२.    रसचडेंश्वर रस – १ गोळी सकाळ संध्याकाळ आर्द्रक रसासह ।
३.    बचनाग ५० mg+ रससिदूंर ५०  mg + करंज बीज १५० mg+ गुळवेल सत्व- ३०mg  -हयाला लिंबूरसाची भावना दिली.
व १-१ गोळी दिवसा दोनदा तिनदा आजार व व्यक्ती
शक्ती नुसार दिली.

 • हे सर्व काही आपण घरामध्ये करू शकता
 • -रात्री शक्यतो १०.३0 ते ११ च्या आधी झोपा.
 • – दीर्घ व गाढ झोप घ्या रोगप्रतीकार शक्ती वाढेल.
 • – दररोज सकाळी च्यवनप्राश घ्या १ ते ५ चम्मच पर्यत
 • तोडांत चावून घोळुन घ्यावा कारण रसायन औषध आहे त्याला तोंडात घोळुन घोळुन खाल्यानेच
 • चांगले परिणाम मिळतात व रोगप्रतिकार शक्ती
 • वाढते व कोरोना काळजी घेता येेेेते.
 • – आवळ्याचा मुरब्बा, लोणचे, आवळकाठी, आवळा
 • चुर्ण शक्य असेल ते दोन्ही वेळा घ्या.
 • – मुलेठी | यष्टीमधुचा काढा पोटात घ्या व त्यानेच गुळल्या पण करा.
 • – सकाळी उठताबरोबर गरम पानी ध्या
 • _ दिवसभर दर तीन तासाने ग्रीन टी, शहद , दालचीनी, इलायची व आर्द्रक घालुन घ्या
 • – डोक शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, बातम्या
 • जास्त पाहु नका, सर्व ठीक होईल व पुन्हा चांगला वेळ
 • येईल, पण आज जसा तुम्हाला वेळ मिळाला
 • आहे तसा पुन्हा एवढा वेळ तुमच्या परिवार करिता
 • कामातुन तुम्हाला सहजतेने काढता येणार नाही.
 • दक्ष रहा, घरी रहा, स्वतःला व परिवाराला वाचवा. व कोरोना काळजी घेेेेेेवुया.

डाॅ. नितेश खोंडे

आयुर्वेद सल्लागार व चिकीत्सक

1 comment

 1. Ajay Dhanvijay Desai

  I am having anxiety , Insomnia , fear , depression problem. I am in Mumbai. Want to cure myself and live Healthy, Happy, Blissful life.
  Want to enhance my willpower.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Signup For Parijatak Latest Newsletter

Subscribe to the Parijatak Latest Health Newsletter and get regular updates on Dr.Nitesh Khonde latest health Tips, videos, health & wellness, blogs and lots more.

 • Newsletter

  Sign up for regular updates & upcoming events

Top