स्थूल आणि आयुर्वेद

आज स्थूल ता हि सर्वाना भेडसवणारी समस्या हली आहे .स्थौल्य मध्ये भारताचा जगभरात ३ रा नंबर लागतो .स्थूलतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते .स्थुल तेची समस्या आज केवळ मध्यामावस्थेत दिसून येते असे नाही तर आज किती तरी लहान मुले हि या समस्याने पिडीत असतात .

माझ्या कडे येणारी नारायणी हि फक्त २९ वर्षाची .तिला ४ वर्षा ची एक मुलगी सुद्धा आहे . बाळंतपणा नंतर एकदम झपाट्याने वजन वाढायला लागले .लग्ना पूर्वी नारायणी एकदम सड –पातळ होती .पण आज तिला पहिले तर कोणी तिला ओळखू सुद्धा शकणार नाही एवढी ती फुलली .कारण म्हणजे ती आज स्वतः कडे लक्षच देत नाही ह्या मुळे स्थूल झाली .घरातील सर्व व्यक्तींची जवाबदरी तिच्या वर आहे ,पूर्ण घराचे काम करणे .मुलीला सांभाळणे ,नवरा ,सासू –सासरे यांचे सर्व काम करणे ,सतत शिळे अन्न खाणे ,रात्री उशिरा जेवणे या सर्व कारणाने तिची दिनचर्या पूर्णत: अनियमित झाली होती व त्या मुले ती तिच्या कडे लक्ष देवू शकत नाह्वती परिणामी तिचे दिवसेंदिवस वजन वाढू लागले .आज जवळपास ५०% स्त्रियांची हीच दिनचर्या असते .निकृष्ट प्रतीचे जेवण ,शिळे अन्न व व्यायामाचा पूर्णत: अभाव हेच वजन वाढीचे प्रमुख कारण आहे .याशिवाय –

अतिशय जड ,मधुर रसात्मक,थंड,तेलकट –तूपकट पदार्थ खाणे ,दुपारी झोपणे ,कोणतीही चिंता न करणे मेद्य पदार्था चे सेवन करणे आणि बीज दोष या मुले पण स्थूल  पण येतो .

अचिंतया हर्षणेन ध्रुवं संतर्पणेन च l

नित्यस्वप्नप्रसंगाच्च नरो वराह इव पुष्यति l l

वरील कारणाने शरीरातील दोष दुषित होतात व पुरुष शरीरामध्ये डुकराप्रमाणे चरबी साठून लठ्ठ होतो .स्थौल्या मध्ये मेदाची वृद्धी होऊन वृद्ध झालेल्या मेडाने स्त्रोतसा चा अवरोध निर्माण होतो व त्या मुळे अन्य धातूंची पुष्टी होत नाही .या अवरोधाने वायू च्या मार्गात हि अडथळा निर्माण होतो आणि हा वायू पोटातील जठराग्नी चे अधिक संधुक्षण करायला लागतो .त्यामुळे खालेल्या आहाराचे लगेच पचन व शोषण होतेव अधिक भूक लागायला लागते .या अधिक आहाराने अधिक मेदाची वृद्धी होते व त्यातून पुह्ना स्त्रोतोरोध तयार होतो .असे विष चक्र सतत चालत राहते आणि स्थौल्य या व्याधी ची निर्मिती होते .

मेदाची संचीती हि प्रथमत: उदार भागी व्हायला लागते म्हणून स्थूल व्यक्ती मध्ये पोट सुटणे हे एक प्राधानिक लक्षण दिसून येते .

त्याशिवाय –

आयुष्याचा ऱ्हास होणे-मेद धातूची अधिक प्रमाणात उत्पत्ती झाल्यामुळे अन्य धातूची निर्मिती कमी होत असते .तसेच तयार होणारा मेद धातू हि विकृत स्वरूपाचा असतो .त्यामुळे आयुष्य चा र्हास होत असतो .

जवोपारोध – जाव म्हणजे उत्साह .धातूंना आवश्यक पोषण न मिळाल्याने शरीरात दुर्बल्य येते .शारीर शिथिल होतो आणि उत्साह दिवसेन दिवस कमी होत जातो .

कृच्छ्व्यवायता-शुक्र धातू ची उतपत्ती कमी झाल्याने तसेच शुक्रमार्ग मेदाने आवृत्त झाल्याने मैथुन शक्ती कमी होते .

दौर्बल्य-शरीर धातू ची उत्पत्ती विषम असल्याने शाररीक दुर्बलता येते .

दौर्गान्ध्य-स्वेद हा मेदाचा मल आहे .विकृत मेदागणी मुले घाम स्धिक तयार होतो आणि घाम मुले शाररीक दुर्गंध यायला लागते .

स्वेदाबाध –हणजेच अधिक घाम येणे .मेदातील पिस्चीलते मुळे किंवा दोष दुष्टी मुळे धिक घाम येतो .शरीरात कफाच्या संसर्गाने मेद हा अधिक शिथिल झालेला असतो परिणामी शरीरातील क्लेद अधिक वाढतो .

अतिक्षुधा व अतितृष्णा –कोश्तातील वायू संचारणाने अधिक भूक व तहान लागते .

चिकित्सा –

गुरु चातर्पनं चेष्ट स्थुलानां कर्षनं प्रति l

स्थौल्यामध्ये मुख्यत: आहारा वर नियंत्रण ठेवणे व जीवन शैलीत बदल करणे गरजेचे ठरते .आहारात वापरणारी द्रव्य हि पचनास जड परंतु ज्यामध्ये सारभाग कमी आहेत अशी असावीत .आहार द्रव्ये हि रुक्ष व कठीण असावीत .यासाठी यव,कुळीथ ,नाचणी ,वारी ,बाजरी ,अनेक प्रकारची तृण धान्य वापरणे हितावह ठरते . मध हे अपतर्पण करणरे आणि मेद धातू चे क्षरण करणारे आहे म्हणून मधा चा उपयोग करावा .

वातघ्नान्यन्नपानानि श्लेष्ममेदोहराणी च l

रुक्षोष्णा बस्तयस्तीक्ष्णा रुक्षाण्युव्दर्तनानि च l l

औषधी हि कफहर,मेदघ्न पण वात प्रकोप न करणारी असावीत .म्हणून यासाठी त्रिफळा ,गुग्गुळ  त्रिकटू चे कल्प वापरल्यास लाभ मिळतो .

बस्ती-रुक्ष व उष्ण द्रव्याचा बस्ती केल्यास मेद धातू चे क्षरण होते .या साठी वत्सकादी गणाचा बस्ती करावा .

उध्वर्तन –त्रिफळा ,कोल-कुलाथ्यादी चूर्ण याने उध्वर्तन केल्यास मेद धातू चे क्षरण होते .

स्थूलते मध्ये कटू –तिक्त पदार्थाचे सेवन करणे अधिक चांगले असते .अश्या द्रव्यांनी सिद्ध पाणी वापरल्यास आणि कोष्ण अल घेतल्यास लेखन कर्म घडते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते .

जर आपण स्थूल ते ची नित चिकित्सा केली तर हा व्याधी आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आटोक्यात अनु शकतो फक्त गरज आहे एका प्रयत्नाची …………..