श्वेत प्रदर

काही दिवसापूर्वी एक जोडपे माझ्या क्लिनिक मध्ये आले .सीमा हि दिवसेंदिवस बारीक होत चालली आहे ,तिचे हात-पाय –कंबर सतत दुखत राहते ,नेहमी कमजोर पणा जाणवत राहते अशी तक्रार सीमाच्या नवऱ्याणे माझ्या जवळ केली .खूप उपचार केले पण काही फरक दिसला नाही.उलट तिचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढतच जात आहे .मग मि सीमा चे इतिवृत्त घ्यायला लागले त्यावरून असे आढळले कि सीमाला अंगावरून सतत पाणी जात असल्याने तिची हि अवस्था झाली आहे .

अंगावरून पांढरे पाणी जाणे हि जरी मोठी व्याधी नसली तरी जर या व्याधी कडे दुर्लक्ष केले असता हि एक मोठ्या व्याधी ची निर्मिती देखील करू शकते हे आपण लक्षात घ्यायला हवे.आज किती तरी स्त्रिया ज्यांना हा त्रास असतो त्या लाजेमुले ,निष्काळजी मुळे किंवा अज्ञानामुळे या कडे दुर्लक्ष करतात .परिमाणी कधी कधी तर त्यामुळे गर्भाशय काढण्याची संधी हि डोळ्यासमोर येऊन उभी राहते .म्हणूनच पांढऱ्या पाण्याच्या तक्रारी कडे दुर्लक्ष न करता ताबड-तोब वैद्या कडे जाऊन योग्य सल्ला घेणे आवश्यक ठरते .

आयुर्वेदामध्ये या व्याधी ला श्वेत प्रदर असे म्हंटले जाते .श्वेत म्हणजे पांढरे आणि प्रदर म्हणजे अंगावरून जाणे . यामध्ये होणाऱ्या स्त्रावाचा रंग हा पांढरट किंवा पिवळट असतो.पांढरे पाणी जाण्याची अनेक करणे आहे .कधी कधी हे पांढरे पाणी जाणे नैसर्गिक बदलामुळे पण होत असते तर कधी शाररीक विकृतीमुळे .

अधिक शाररीक संबंधमुले,ओव्हुलेशनमले, गर्भिणी मध्ये तर कधी पौगंडा अवस्थेत येणाऱ्या बदलामुळे हा योनि स्त्राव होत असतो .पण मात्र ह्या तक्रार त्याकाळा पुरतीच मर्यादित असते .पण मात्र जेह्वा हा स्त्राव शाररीक विकृतीमुळे निर्माण होतो तेह्वा मात्र या स्त्रावाची चीकीत्स्ता करणे गरजे चे ठरते .

कृमी, रक्ताल्पता ,अंतःस्रावी ग्रंथींचे आजार,मानसिक विकार ,जीवाणू संक्रमण, गर्भाशयाच्या तोंडास जखम होणे, गर्भाशय खाली सरकणे, कंबरेमध्ये स्थित अवयवांना संसर्ग होणे,योनीमध्ये अल्सर होणे,गर्भ निरोधक म्हणजेच copper-T चा वापर केल्याने ,वारंवार गर्भापात झाल्याने ,मधुमेह या सारख्या शाररीक विकृती मुले श्वेत प्रदर हा त्रास होत असतो.

अस्वछता हा देखील श्वेत प्रदाराच्या निर्मातीतील मुख घटक असतो .मासिक पाळीच्या वेळेस जनंगाची नीट काजी नं घेतल्याने ,असुरक्षित संभोग केल्याने देखील हा त्रास होतो .

त्याशिवाय  कुपोषण, अति प्रवास करणे, अति शारीरिक श्रम, व्यसनाधीनता ,नीट झोप न घेणे इत्यादी कारणांमुळे देखील योनी व गर्भाशयाचा भाग कमकुवत होऊन जंतुसंसर्ग होऊन श्वेत प्रदर चा त्रास निर्माण होतो .

लक्षणं

 • योनीमार्गातून पांढरा, चिकट स्रव बाहेर पडणं
 •  योनीमार्गात खाज येणं
 •  कंबर दुखणे ,पाठ दुखणे
 • ओटीपोटात दुखणे
 • हात-पाय-पोटर्या दुखणे
 • मासिक पाळी अनियमित होणे
 •  चक्कर येणं
 •  अशक्तपणा ,कमजोरी जाणवणं
 • बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
 • भूक न लागणे
 •  डोकं दुखणे
 •  पोट फुगणे

हि लक्षणे श्वेत प्रदर मध्ये दिसून येंत .जेह्वा जीवाणू चा संसर्ग नसतो तेह्वा स्त्राव हा पंधरा व दुर्गंधरहित व पातळ असतो .तर जेह्वा जीवाणू चा संसार असतो तेह्वा स्त्राव पूययुक्त ,दुर्गंधीत व घट्ट स्वरूपाचे असते .

प्राथमिक उपचार –

 • अम्ल व क्षार युक्त पदार्थ न घेणे
 • दररोज योनीमार्गाची स्वच्छता राखणे
 •  प्रत्येक वेळी मूत्रविसर्जनानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुणे
 •  शरीरसंबंधांनंतरही स्वच्छता राखणे
 • मासिकपाली च्या वेळी कापडाचा वापर न करता सानिटरी पड वापरणे .

घरगुती उपचार –

आवळ्याचे चूर्ण ३ ग्राम मात्रेत रोज १ महिना सकाळ संध्या काळ घ्यावे .

पिंपळा च्या २-४ पानाचा लगदा करून तो दुधात उकळून पिल्यास श्वेत्प्रदार चा त्रास कमी होतो .

भाजलेल्या चाण्यामध्ये गुळ टाकून त्यावर १ कप दुध तूप टाकून घेतल्यास फायदा मिळतो .

नागकेशर चूर्ण 3 ग्राम मात्रत ताका सोबत घेतल्यास लाभ मिळतो .

यष्टीमधु चूर्ण १ ग्राम मात्रेत सकाळ संध्या काळ पाण्याबरोबर घ्यावे .

कादुनिम्बाची साल व बाभळी ची साल यांचे सम भाग चूर्ण मधाबरोबर घेतल्यास लाभ मिळतो

वेलची ,अशोक च्या झाडाची साल ,दालचिनी आणि पांढरे जिरे हे सर्व समप्रमाणात (१०ग्म) घ्यावेत आणि १ ली.पाण्यात उकळून अर्धे शिल्लक राहीपर्यंत उकळून गळून घ्यावे .हा काढा दिवसातून ३ वेळा घेतल्यास श्वेत प्रदर मध्ये लाभ मिळतो .

आयुर्वेदिक उपचार –

पुष्यानुग चूर्ण ,प्रदारान्तक चूर्ण ,गंधक रसायन ,गुडूची सत्व ,प्रवाळ पिष्टी ,कामदुधा रस त्रिफळा चूर्ण ,बोल पर्पटी ,लोध्रासव,चंदनासव या सारख्या कल्पांची उपाय योजना वैद्याच्या सल्ल्याने करावी .

आयुर्वेदातील काही पंचकर्मे केल्यास जीर्ण असा श्वेत प्रदर देखील बरा करता येतो .

योनी धवन- त्रीफाल्याच्या काढ्याने योनि धवन केल्याने जन्तु  संसर्ग थांबण्यास मदत होते .

पंचवल्कल च्या काढ्याने योनि धवन केल्यास तेथील सूज व खाज कमी होते .

बस्ती चिकित्सा –औषधी द्रव्याच्या सिद्ध तेला चा व काढ्याचा बस्ती घेतल्यास श्वेतप्रदर चा त्रास कमी होतो .