मायोपिया व आयुर्वेदा

आदित्य १३ वर्षचा ,रोहानी व अजय चा मुलगा शाळेमध्ये topper  फक्त अभ्यासात च नाही तर इतर क्षेत्रात  मध्ये सुद्धा नं . १. पण दिवसदिवस तो अभ्यासत मागे पडायला लागला होता. व सतत डोके दुखते  असी तक्रार करू लागला तसेच ब्लाक  बोर्ड वरील अस्पष्ट  दिसते हे पण म्हणून लागला. शेवटी रोहणी त्याला opthalogist  कडे घेऊन गेली. तेव्हा त्याला मयोपिया आहे हे लक्षात आले .मओपिया म्हणजे निकट दृष्टीता .तेह्वा डॉक्टरांनी त्याला चष्मा लावण्यास सांगितले,चष्मा लाऊन आदित्यचि दृष्टी  क्षमता तर वाढली होती पण तो चष्मा लावून खूश  नव्हता. रोहिणी ने आयुर्वादिक चिकित्सा बद्दल नेट वर माहिती काढली व ती क्लिनीक ला आली. मी तिला सांगितले कि आजकाल मयोपिया हे खूपच कॉमन ली   आढळतो. लहान पणातच (vision power ) पाहण्याची क्षमता वाढते तर किशोरावस्थेत  डोळ्याची लांबी वाढते . पण निकट दृष्टी दोषामध्ये हि लांबी काही कारणामुळे जास्त वाढून जाते त्यामुळे  डोळ्यात जाणारा प्रकाश  रेटीना वर केद्रित होऊ शकत  नाही त्यामुळे समोर दिसणारी प्रतिमा हि अधुक दिसते,अस्पष्ट  दिसते. ज्याला आपण मयोपिया म्हणतो . आयुर्वेदामध्ये शालाक्यतंत्र  असे आहे ज्यामध्ये डोळे, नाक , कान व घस्याचे रोगाचे  वर्णन आले आहेत तसेच त्यावरील चिकित्सा देखिल वर्णिलेले आहे. मयोपिया ला … अंतगर्त आयुर्वेदात सागितले आहेत.

मयोपिया होण्याची मुख्य कारण म्हणजे. आहारामध्ये जीवनसत्व  व मिनरलचा अभाव असणे . आपला आहार हा monotonous असतो .

तसेच खूप t. v. पहाणे , कमी प्रकाशात वाचन करणे , झोपून वाचण करणे , सतत कॉम्पुटर,मोबाईल  यासारख्या वर  काम करणे, व्यायामाचा अभाव यामुळे हा त्रास होतो . तसेच ज्याला  दीर्घकालीन constipation   आहे किवा जीर्ण प्रतीश्याय असतो त्याला सुद्धा  मयोपिया होऊ शकतो .

मग मी आदित्य चे परीक्षण  केले  व त्याची चिकित्सा कारायला सुरवात केली . मला रोहीणी णे सागितले होते की आदित्य ला पळसाकडे साफ होत नाही. मग मी त्याला  त्रिफला  चूर्ण सुरू केले तसेच त्रिफला हे नेत्रासाठी उत्तम आहे व हे रसयाने द्रव्य देखील आहे सोबतच यष्टी मधू चूर्ण व खडीसाखर देखील सुरु केले  . सोबत तिला आहरमध्ये ६ हि रस असले पाहिजे व त्याचे महत्व काय  हे पटवून सागितले. सोबत जेवणामध्ये गायची तूप असावे हे देखिल सागितले . रोहिणीला अति तिखट, अति मसाल्याचे , आंबविवले अन्न (fermented food ) जेक फूड हे सर्व आह्रातून बंद करण्यास सागितले सोबतच आदित्याला साप्तमृता  लोह व त्रिफला घृत ची  योजना केली व नेत्र प्रदेशी जाळूकाचारण  सुरु केली.

बलतेलाचे  नस्य  आदित्य ला रोज घरी करण्यास सागितले .आदित्यला  चुकीच्या पद्धतीने वाचन करणे , t. v. पहाणे हे टाळlयाला सागितले . सुरवातीला आदित्य हा treatment  ला व जीवनशैली तील बदल ला प्रतिसाद नाही घ्यायचा पण चष्मा  नाही च हवा  म्हणून हळुहळू प्रतिसाद देवू लागला.

तसेच आदित्याला त्राटक व प्राणायम देखील शिकवले . त्याला  सकाळी वडीलाबरोबर फिरायला जाणे हे देखील सागितले . रोहाणीला घरीच गायीच्या तुपाने पादाभ्यंग  करण्यास सांगितले  . हे सर्व उप्रक्रम मी ३ महिने सतत केले नंतर opthalogist  कडे जावून डोळे तपासंण्यासाठी सागितले तर आदित्याचा नंबर पाहिले  पेक्षा कमी झालेला होता .आता आदित्यला खात्री देखील पटली होती ती का कालातरणे का होइना  माझा चष्मा  देखील सुटेल म्हणून रोहीनी व आदित्य णे पुढील followup नियमित  ठेवला . आज आदित्य चष्मा न  लावता ब्लाक  बोर्ड वरील अक्षर  लिहू वाचू शकतो . त्याला चष्म्याची  बिलकुल गरजच नाही.

शेवटी आदित्यच्या मी सर्व ओषधी बंद केल्या व त्याला मात्र नियमित व्यायाम प्राणयाम व त्राटक करण्यास सागितले . आज आदित्य सागितलेली नियम fallow  करतो व मध्ये –मध्ये मित्र म्हणून भेटायला यतो .

आदित्य सारखे कित्येक लहान मुलांना हा मयोपिया चा त्रास असतो . पण चच्मा किवा लेन्से किवा लेसर हि त्याची चिकित्सा मर्यादित नसून आयुर्वेदात देखील काही नवीन व उत्तम चिकित्सा  आहे हेच या लेखातून सागयाचे होते.