न वेगान धरनियात

न वेगान धरनियात –

काही दिवसापूर्वी TV वर एक बातमी एकण्यात आली होती एका  कि लो च्या व्यक्ती ला इमारती च्या १८ व्या मांजल्या पासून बाहेर काढण्या साठी crain चा वापर करावा लागला .नंतर डॉक्टरांनी नंतर त्या व्यक्ती च्या तपासण्या केल्या व नंतर त्या ची surgery केली .तेह्वा डॉक्टरने सांगितले कि त्या व्यक्ती मध्ये sr.creatine  n uric acid हे दोन घटक अत्याधिक प्रमाणात वाढलेले होते .त्यामुळे लिवर वर देखील परिणाम झाला व त्याचे वजन पटापट वाढायला लागले .व वजनाची परिणाम इतर अवयव वर झाला परिणामी त्याची स्थिती अधिकच वाईट झाली .डॉक्टरांनी या सर्वा मागील कारण सांगताना म्हंटले कि हा एक multination company मध्ये मोठ्या post वर काम करायचा. काम अधिक असल्याने तो मुत्राचे विसर्जन वेळे वर नाही करायचा म्हणजे मुत्राप्रवृत्ती वाटल्यास देखील तासोनतास मुत्रास जात नाह्वता त्यामुळे मूत्रपिंडा मुत्राने भरून जायचे व ते ताणल्या जायचे . नियमित असे होत असल्या मुले हळू हळू मूत्रातील अपद्राव्या म्हणजे creatinine ,uric acid साचायला लागले परिणामी शरीरात विविध आजार घडले .

आपण कामात नकळत इतके व्यस्थ होऊन जातो कि मल ,मूत्र यासारख्या वेगाचे धारण करतो ,तसेच कधी कधी लोक व्याव्हारथ म्हणा किंवा लाजे पायी आपण अपान या वेगाचे नेहमीच धारण करतो . छींक, उचकी ,भूक ,तहान ,झोप ई वेगळा पण अपान वेळेअभावी धारण करतो .पण हे पूर्णतः चुकीचे आहे . जर या सर्व वेगाला वेळेवर उत्सार्गीत केले नाही तर हे एक भयानक रोगाला कारण ठरू शकतात .

आचार्य चरकानि १३ असे वेग सांगितले आहे कि जे धारण केल्यानी रोग निर्मित होतात .

 1. मूत्र – या वेगाचे धारण केल्याने मूत्राशय व मुत्रेंद्रिय ठिकाणी शूल ,मुत्राप्रवृत्तीत वेदना म्हणजे dysuria ,शिरः शूल (headache ),मूत्राशयात ताण निर्माण होणे (tension in bladder ),BPH ,renal calculi या सारख्या व्याधी निर्माण होतात .
 2. मल – या वेगाचे धारण केल्याने पक्वशाया मध्ये शूल ,आध्मान ,मल व अपान रोध ,पिंडली शूल तसेच piles ( अर्श ),fissure (परीकार्तिका ),constipation ,व्याधी होतात .
 3. शुक्र –या वेगाचे धारण केल्यास मेढ्र व वृषण मध्ये शूल ,हृदयशूल ,शुक्र अश्मीरी ,BPH ,hydrocele ,varicocele ,diabetes –albuniurea,penil dysfunction या सारख्या व्याधी होतात
 4. अपान –(flatus )-पोट फुलणे ,पोटात दुखणे ,क्लम ,मल मूत्र चे विसर्जन स्वस्थानातून न होणे ,हिक्का कास ,अस्थमा ,रrhinitis ,gastritis,ulcerative colitis  हे विकार होतात
 5. वमन –म्हणजे उल्टी या वेगाचे धारण केल्याने कंडू व कोठ  (urticaria ),अरुची (loss ऑफ appetite ),शोथ (swelling ),पांडू (anemia )कुष्ठः ,eczema ,psorasis या सारखे विकार होतात
 6. छींक –वेगाचे धारण केल्याने माण्यास्थंभ (neck stifness ),अर्दित (facial palsy ),अर्धावभेदक (hemicrania ),शिरःशुल
 7. उद्गार – ढेकर वेग धारण केल्याने हिक्का (hiccup ),कास (cough ),कंप ,हृदय व उरः भागी वेदना होणे
 8. जृम्भा –विनम-म्हणजे शरीराच्या अंगा मध्ये वाक येणे ,आक्षेप (convulsion ) संकोच ,कंप वात (पर्किंसोनिस्म),सुप्तीवात (tingling )
 9. क्षुधा –भूक –कृशता ,दुर्बलता (weakness ),अंगमर्द (bodyache ),भ्रम (giddiness )
 10. तृष्णा –मुख शोष ,बधीर्य ,हृदय अवसाद ,दौर्बल्य
 11. अश्रू –प्रतीश्याय ,नेत्ररोग ,भ्रम,हृदय संबधी व्याधी ,rhinitis ,optic nerve problem ,
 12. निद्रा –जांभई ,अंगमर्द ,शिरोरोग ,तंद्र,मानसिक विकार ,diseases of eyes ,
 13. निश्वास –गुल्म ,हृदय रोग ,मूर्च्छा

गोष्टी लहान असली तरी खूप उपयोगाची आहे .जर अपान या वेगाचे कधी धारण केले नाही तर आपल्याला वरील विकारापासून मुक्ती मिळेल व आपली हालत त्या २२० कि लो मानसं सारखी होणार नाही .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top