त्वचाविकार आणि मानसिक ताण-तणाव

क्लिनीकमध्ये रोज एक ना एक सोरायसिस चा किंवा हेअर फाॅल चा रुग्ण येतो. त्याची तक्रार असते की खूप औषध उपचार झालेत पण सोरायसिस चे चकते वाढतच जातात, पथ्य पण पाळतो तरी काही उपयोग नाही. आधीच आॅफिस मध्ये कामाचा ताण आहे आहे वरुण हे चेवतपंेपे अजुन भर घालत आहे. ंिकंवा कित्येक युवक

तक्रार करतात अभ्यासाचा ताण खुप आहे. काॅमपिशन अधिक आहे त्यामूळे जागरंण करावे लागते वरुन चेह-यावरील पिंपल्स दिवसंेदिवस वाढतच आहेत. ही रुग्ंणाची तक्रार मी रोज ऐकते. तेव्हा मी त्यांना हेच समजावते की केवळ अपथ्यकर आहार-विहार किवा विरुध्द आहार विहार यामूळेच त्वचारोग होतात असे नाहीत तर मानसिक ताण-तणाव वाढन्याचे देखील त्वचाविकाराची उत्पत्ती होते किंवा त्वचाविकार मानसिक ताण-तणावामुळे अधिक वाढू शकतात. जेव्हा माझ्याकडे वरिल तक्रार घेवून रुग्ण येतात तेव्हा मी त्यांना मानसिक ताण- तणाव कमी करणा-या औषधी व उपक्रमाची सूरवात करते परिणास्वरुपी मला त्यांच्या विकारावर यश मिळतो.

आता मानसिक ताण-तणाव वाढल्याने काय असे घडले की, त्यामुळे त्वचारोग उत्पन्न झाले हे समजून घेवू या ? लोभ, शोक, भय, क्रोध, ईष्र्या, राग, चिंता, इ. धारणीय वेग आहेत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने हे वेग धारण करायला हवे. पण असे प्रत्यक्षात कधी होतच नाही. त्यामुळे त्रिदोष ;वात-पित्त-कफद्ध प्रकृपीत होतात.
हे प्रकृपीत दोष अग्निमांदा करुन सामरंसाची उत्पत्ती करतात. शरीरात राग, चिंता इ. कारणाने पित्तातील उष्ण गुण वाढतो व तो रक्ताला विदग्ध करतो त्यामुळे स्वेदवह व उदकवह स्त्रोतसाची दुष्टी होते. हे विदग्ध दोष त्वचेच्या ठिकाणी संचीत होतात व विविध त्वचाविकार निर्माण करतात.

माॅर्डन एसपेक्ट ही पाहीले तर मेंदु, मन व त्वचा हे एकमेकांची वेगवेगळया पातळीवर जूळलेले असतात. मज्जातंतू हे मंेदू त्वचा व मल यांना जोडणारे असतात.उदाहरणार्थ आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा आपले चेहरे पडलेले असते. किंवा आपण व्याधीग्रस्त झाल्यास चेह-याचा तेज कमी होते. म्हणजे आपल्या भावना रिफलेक्ट करणारी त्वचाच असते.
शरीरामध्ये मंेदूची उत्पत्ती ज्या पेशीपासून झाली आहे. त्याच पेशीपासून झाली आहे त्यास पेशी पासून त्वचेची देखील उत्पती झाली आहे. त्यामूळे ते एकमेकांचे बधुंच म्हटले तरी चालेल, जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो तेव्हा शरीरार स्ट्रेस हाॅरमन स्त्रवतात ज्यात
कॉर्टिसॉल नावाचे देखील एक हाॅरमन आहे.

कॉर्टिसॉल मूळे त्वचेतील तेलीय अंश वाढतो व त्यामुळे पिंपल्स होतात.तसेच मानसिक ताण-तणाव वाढल्याने शरीरातील ग्लुकोकॉर्टीकॉइड चे प्रमाण कमी व त्यामुळे सोरायसिस चे प्रमाण देखील वाढते  मानसिक ताण-तणाव वाढल्याने केस,गळणे,नख लवकर सुटणे, खुप घाम येणे यासारख्या प्रोब्लेम देखील वाढतात.

अमेरीकन अॅकेडमी आॅफ डरमटेलॅजी नुसार त्वचाविकार मध्ये 30ः कारण हे मानसिक ताण-तणाव असतो व जेव्हा आपण मानसिक ताण-तणावाला ट्रिट करतो तेव्हा आपल्याला चांगले यश मिळते. म्हणूनच त्वचाविकारांवर औषधी चिकित्सा,आहार ,पथ्यापथ्य याबरोबर स्ट्रेस मॅनेजमेन्ट थेअरपि ही वापरायल्या हव्यात.

त्याचबरोबर योगशास्त्रातील प्राणायाम, ध्यान धारणा, म्युझिकल थेअरपि व फलोअर थेअरपि यांचाही संक्षेपाने वापर केल्यास रुग्णास उत्तम गुण येतो.
बरेच वेळा औषधी चिकित्सा दिली जाते. परंतु वारवार उदभवणा-या त्वचा विकांरामध्ये मानसिक ताण-तणावचा इतिहास जाणून चिकित्सा केल्यास रुग्णास लवकर व्याधीमुक्त करता येतो.