अपचन म्हणजे घेतलेले अन्न हे नीट न पचने जगामध्ये एकही व्यक्ती असा सुटला नसेल, की ज्याला अपचनाचा त्रास झालेला नसेल.

कुणाला खुप अॅसिडीटी होणे तर कुणाला खुप गॅसेस होणे किंवा सतत मलबध्दता राहाणे हा त्रास भेडसावत असतो, हा अपचनाचा त्रास प्रत्येकात वेगवेगळे लक्षणे येतो.

तोडांपासून तर गुदव्दारापर्यंत सर्वसाधारण, मीटर इतक्या लांबीची आपली पचनसंस्था तोंडावाटे घेतलेल्या आहाराचे पूर्ण पचन करणे व त्यातील पोशणद्रव्ये शरीरात शोषुन घेणे व शेवटी उरलेल्या मळ हा शरीरातून गुद मार्गादवारे बाहेर टाकण्याचे काम ही पचनसंस्था करते.

सामान्यतः घेतलेले अन्न अन्ननलिकेतून पोटामध्ये आल्यानंतर  त्यावर पाचक स्त्रांवाची प्रक्रिया होते, व त्या अन्नाचे योग्य रितीने पचन होते. मात्र अग्निमांदयामुळे हया पाचकाग्नी किवा पाचक स्त्रांवाची निर्मिती योग्य प्रमाणात न झाल्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही व त्यामुळे अपचनाची तक्रार निर्माण होते.

कारणे –

– अयोग्य आहार

– आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे जेवणाची वेह निघून गेल्यावर जेवणे रात्री उशीरा जेवण

करणे

– न चावता जेवण घेणे अधिक मसालेदार तेलकट पदार्थ घेणे.

– चहा कॉफि इ. अधिक उपयोग करणे.

– धुम्रपान तंबाखु इ. व्यसन,

– अधिक मानसिक ताण-तणाव अति काळजी करणे.

 

लक्षणे

– भुक न लागणे अन्न खाण्याची इच्छा न होणे

– आंबट टेकर येणे मळमळ वाटणे.

– छातीत जड वाटणे किंवा जळजळ होणे.

– मलबध्दता,

– चक्कर येणे.

– ह्रद्यात धडधडणे.

– पोट फुगणे किंवा दुखणे.

– अल्प परिश्रम केलयाने हो थकवा जाणवणे.

– नीट झोप न लागणे.

 

हा त्रास तात्पुरत्या असला तर ठिक पण जर हा अपचनाचा त्रास दिर्घ काळ शरीरात राहीला तर हा मोठया रोगाच्या उत्पतीस कारणीभुत ठरतो. जर योग्य वेळेत अपचनावर उपाय केले नाही, तर सतत उलटया होणे उलटीत रक्त पडणे. वनज कमी होणे गिळतांना त्रास होणे इ. विकार देखील निर्माण होतात.

 

Follow by Email
Facebook
Facebook
Twitter
Visit Us
LinkedIn
Google+
Google+
http://parijatak.com/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be/
Instagram