गर्भ संस्कार ह्या विषयी सध्या आयुषमंत्रालयाने पुस्तक प्रकाशित केलेले आहे व त्यावर सध्या जी काही टीका होते आहे ती टीका सोडली तर आयुर्वेदामध्ये जे गर्भ संस्कार वर्णन आलेले आहे त्याची महिमा खूप मोठी आहे.

“संस्कारो गुणान्तराधान” “संस्कारो गुणान्तरारोपणम” म्हणजे कोणावर ही कुठलेही संस्कार केले तर त्यामुळे गुणाची वृद्धीच होते, त्यामुळे गुणांचे रोपण केले जाते.

होणारी नवीन पिढी ही आरोग्य संपन्न बुद्धिवान व व्यगरहित असावी यासाठी गर्भ संस्कार करणे हे अत्यंत आवश्यक आहे .

मानवी धन संपत्ती चि उत्तम गुंतवणूक म्हणजे आपले बाळ संस्कारी होणे .संस्कार ही एक शक्ती आहे. हे संस्कार बाळ जन्मल्यावरच करता येते असे नाही तर त्याचा पाया हा गर्भावस्थेतच टाकल्यास ते अधिक मजबूत होते .

उत्तम गर्भाची प्राप्तीसाठी मातापिता चि बीज शुद्धी करणे आवश्यक आहे .पण जितकी बीज शुद्धी महत्त्वाची असते. गर्भधारणाच्या वेळी मातापिताचे मन जर इर्श्या ,द्वेष ,मत्सर, लोभ, मोह इ .भावनेने व्याप्त असते तर त्याचा परिणाम होणाऱ्या गर्भावर होते .म्हणून आई –वडिलाची मन:शुद्धी होणे आवश्यक ठरते.

आपल्याला अपत्य कोणत्या संस्काराचे, कसे, कोणासारखे दिसण्यापासून तर चारीत्रापर्यंत कोणासारखे असावे, सगळे काही दिलेल्या गर्भ संस्कार दरम्यान वाचलेले पुस्तके, कथा, काद्म्बर्या, दैनदिन जीवनात झालेल्या घडामोडी, किव्वा प्रत्यक्षात ठरवून काही गोष्टी बाळाला सांगणे ते, आचार विचार आणि संस्कार दिशादर्शक ठरतात.

गर्भसंस्काराने बळाचा फक्त शारीरिकच विकास नाही तर मानसिक व आधात्मिक विकास देखील होतो व आपला बाळ हा ‘ALL ROUNDER’ ठरतो.

प्रमेह, रक्तदाब, THYROID  इ .अनेक प्रकारच्या अनुवांशिक व्याधी पासून जर आपल्या बळाला वाचवायचे असेल तर गर्भ संस्कार व गर्भधारणेच्या वेळी शरीर शुद्धी हे महत्त्वाचे आहे .

गर्भ तयार होण्याकरिता बीज अंबू क्षेत्र ह्या सगळ्यांची आवश्यकता असते, गर्भ स्थापना हा एक अपघात नसावा तर तो पूर्वतयारी निशी तयार केलेली योजना असावी, कारण गर्भाकरिता आवश्यक असणारे स्त्रीबीज व पुरुष बीज हे दोन्ही अति उत्तम अवस्थेत असावे, तसेच क्षेत्र म्हणजेच गर्भाशय प्राकृत , अंबू म्हणजे स्त्राव प्राकृत असावेत , हे सगळे प्राकृत व उत्तम करण्याकरिता काही पंचकर्म व औषधी उपाय योजना करता येते, तसेच स्त्री व पुरुष ह्यांची शारीरिक , मानसिक सुदृढता हि मनशांती प्राणायाम ध्यान , शिरोधाराद्वारे व शरीरशुद्धी पंचकर्मा द्वारे करावी.

गर्भ स्थापने साठी समागमाकरिता मनस्थिती चांगली असावी म्हणून बाहेर फिरायला जाऊन किव्वा कामातून व दैनदिन ताणातून बाहेर निघून वेळ काढावा कारण त्या वेळी जे विचार आचार आणि त्रास असतील ते कोठेतरी गर्भामध्ये जात असतात व ते अपत्यामध्ये जाणवतात.

एकदा कि गर्भ स्थापना झाली कि पुढे महत्वाचे कार्य असते ते सुरवातीचे तीन महिने खूप काळजी घ्यायची असते त्या करिता विशेषत्वाने आयुर्वेदामध्ये आलेले वाग्भट संहितेच्या शरीर स्थानामध्ये आलेले गर्भस्त्रावाकरिता असलेले काढे , जे आज मासानुमासिक काढे म्हणून प्रसिद्ध आहेत ते घेतल्या गेलेत कि येणारे सगळे परिणाम-दुष्परिणाम टाळल्या जाऊ शकतात , जसे पहिल्या महिन्यात बाळाची होणारी वाढ चांगली असेल तसेच द्वितीय व तृतीय मासामध्ये होणारी वाढ व दरम्यान येणारे सगळे मळमळ, घाबरटपणा , धडधड, उलटी, डोकेदुखी इ. सहज टाळले जाऊ शकतात. सोबतच गर्भस्त्राव (miscarriage ) होणे सारखे प्रकार सहज टाळता येतात.

बाळाची वाढ हि चतुर्थ मास व पंचम व सहाव्या मासामध्ये मन व ह्य्रुद्य , बुद्धी ह्या क्रमाने तयार होतात त्यादरम्यान मासानुमासीक काढे घेतल्या गेलेत कि मानसिक मजबुती , ह्य्रुद्य रक्तपरिसंच्लन, बुद्धी मध्ये धी धृती स्मृती ची प्रगल्भ असी वाढ व मजबुती येत असते .

सोबतच ह्या दरम्यान आपण सहाव्या महिन्यापासून पुढे बाळामध्ये संस्कारात आचार विचारांची देवाण घेवाण करू शकतो ती कशी, बाळाच्या पित्याने मातेच्या गर्भावरती ( पोटावरती ) हात ठेऊन ज्या गोष्टी आपण बाळाला शिकवू त्या बाळ सहज आत्मसात करत असत. बाळाला आपण सांगत असताना आता सकाळ होत आहे , रात्र, दिवस , भोजन इ. बद्दल सर्व माहिती नेहमी दिली कि , काही दिवसानंतर बाळ हे मातेच्या उठण्याच्या अगदी वेळेवर उठत असते किव्वा कदाचित ते पाच मिनिटे आधी उठून किकपण मारत असते. आपण कीक मारायला सांगितली कि बाळ आपल्या सांगण्याप्रमाणे किक ( पाय ) मारतो, अगदी अनुभवातून सांगतो आहे. हे सातव्या महिन्यापासून पुढे होते.

चरकाचार्यांनी सांगितलेले पूर्वजन्म-पुनर्जन्म हा भाग आपण आजच्या वैज्ञानिक युगामध्ये बाजूला ठेऊ पण ह्याशिवाय चरकसंहितेमध्ये जे काही वर्णन केलेले आहे, गर्भसंस्कार सांगितले आहेत तो खूप अमूल्य असून तो आपला अलौकिक ठेवा-वारसा आहे.

गर्भसंस्कार हि पुरातन काळापासूनच चालत आलेली आहे .याचे वर्णन रामायणात व महाभारतात आलेले आहेतच .

दशरथ राजाने पुत्र प्राप्ती साठी पुत्र कोमष्ट यज्ञ केले होते तेव्हा अग्नीदेवाला प्रसन्न होऊन कौश्ल्या देवीला संस्कारित दुग्ध प्राशन करण्यासाठी दिले होते व त्यामुळे व मर्यादा पुरुषोत्तम अश्या रामाचा जन्म झाला हे काय तर गर्भसंस्कारच ना ! दुसरे उदाहरण म्हणजे अभिमन्यू हा सुभेद्रच्या पोटी असताना चक्रव्हुची रचना अर्जुनानी सुभेद्रेला सांगितले व युद्धाच्या वेळी अभिमन्यू ने चक्रव्हुव तोडून त्यात प्रवेश केला .

हे कसे घडले तर -४ थ्या महिन्यापासून बाळाचे कर्णेद्रिय तयार होतात व सर्व एकू येऊ लागते .कर्कश आवाज ऐकल्याने बाळ दचकतो ,घाबरतो तर मधुर संगीत ऐकून तो खुश होतो .

६ व्या महिन्यानंतर , आपण जे बोलतो ते तों समजतो व त्याला, RESPONS द्यायला लावतो, तो KICK च्या रूपाने. आईच्या हृदयाच्या ठोक्यासोबत बाळ वाढतो  म्हणूनच  आईच मानसिक संतुलन चांगल असल कि बाळाच देखील मानसिक संतुलन चांगल असत

 

सातव्या , आठव्या व नंवव्या महिन्यात बाळाची पूर्ण वाढ होत असताना बौद्धिक वाढ व शारीरिक वाढ,  गर्भिणी ने प्रथम 3 महिने बाळ निरोगी ,सुदृढ असावे यासाठी प्रयत्न करावे नंतर चे 3 महिने बाळाची मानसिकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे व शेवटच्या 3 महिन्यामध्ये बौद्धिक पातळी वाढावी यासाठी प्रयत्न करायचे असते .

चरकाचार्यानी गर्भावस्थेच्या ९ महिन्यात एक –एक प्रकारच्या अवयवांची उपत्ती होते ,जर त्या –त्या महिन्यात घेन्याजाणाऱ्या औषधी ,कल्प,मंत्र ,चि इ. त्या –त्या अवयवावर काम करणारे घेतले तर तो अवयव हा उत्तम प्रकारचा परिपक्व होउन वाढ हि चांगल्या प्रकारे होत असते तरीपण मातेचा आहार विहार , स्पर्श , भावना, इच्छा इ. चा सरळसंबंध गर्भाशी होतो . म्हणूनच नेहमी ह्या काळामध्ये मातेचा आहार विहार सात्विक असायला हवा, तो तामसिक किव्वा राजसिक असला कि तसे बदल बाळात दिसतात, ह्याची अवश्य दखल घ्यावी. मातेचा हळुवार स्पर्श हा बाळाला आंनंद देतो म्हणून सकाळी मातेने नाभीला सूर्य मानून हळुवार सूर्याची किरणे जशी चोहीकडे पसरतात तशी मालिश करावी व हि करत असतांनी सुर्याची १२ नावे घ्यावीत, ह्यातून आई बाळाला संदेश देते कि तू सूर्यासारखा तेजस्वी हो.

आईने ओमकार चा जप केल्यास बाळाची फुफ्फुसे मजबूत होतात. हनुमान चालीसा, रामरक्षा इ. चे नियमित श्रवण केल्यास भय-चिंता इ. मुक्त होतो. त्याचा मानसिक विकास १० पटीने अधिक होतो.

आजचे युग हे स्पर्धेचे युग , प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा व केवळ स्पर्धाच राहिली आहे, अश्या स्थितीत आपले बाळ सुदृढ व टिकून राहावे व ते अनन्य साधारण व्हावे यासाठी गर्भ संस्कार हे मोलाचे ठरते.

ह्यामध्ये पहिल्या महिनेपासून तर नवव्या महिन्यापर्यंत काश्मिरी फळ दुधासोबत गर्भजल वाढून गर्भसंरक्षणासाठी, यष्ठीमधु दुधासोबत बाळाच्या वाढीकरिता, कुमकुम ( केशर ) दुधातून वर्ण सुधारण्यासाठी, ताप्यादी लौह रक्तपरिसंचलनासाठी व heamoglobin  वाढण्यासाठी, प्रवाळ पंचामृत calcium supplement साठी, सुवर्ण शलाका व रजत शलाका सिद्ध जल सेवन बुद्धी व शक्ती वर्धनार्थ, गर्भपाल रस ( गर्भ संरक्षणासाठी ), सुवर्ण मालिनी वसंत, लघु मालिनी वसंत इ. औषधी ची उपाययोजना करावी.

नवव्या महिन्यात पिचू , बस्ती, मात्रा बस्ती, योनी धावन, सुखप्रसावाकरिता तसेच कोणतेही दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपट्याचे रोपटे झोपायच्या बिछान्याच्या खाली पायाला स्पर्श करेल असे इ. सगळी उपाय योजना अवलंबता येते.

शरीरावर जे गर्भ पोटात वाढत असताना पोटावार व पायावर काही stretch marks येत असतात त्याकरिता तिळाचे तेल हलक्या हाताने पोटावर मालिश करावी.

तसेच बाळ गोरे होण्याकरिता व त्वचारोग होऊ नये म्हणून मंजिष्ठा दुधातून, उपाशीपोटी पंचामृत ( खडीसाखरेसोबत ).

नियमित सात दिवस शेवळ्या किव्वा रव्याच्या इ. प्रकारे वेगवेगळ्या खीर खाव्यात. गर्भिणीच्या आवडीनुसार आहार सेवन करावा कारण त्या इच्छा गर्भाच्या असतात. कोठेही मलबध्दता होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी कारण गर्भाची वाढ हि अपान वायूच्या प्राकृतिक पणावर अवलंबून असते. गर्भवती ने तुळसी समोर बसून गायत्री मंत्र किव्वा रामरक्षा मंत्र उच्चारावा कारण तुळस प्राणवायू जास्त देतो व त्याने गर्भास व मातेस प्राणवायू जास्त मिळण्यास मदत होते. दररोज सकाळी १० च्या आत एक नारळ पाणी घ्यावे. दररोज काजु, मनुका, इ खावे. रात्री झोपताना जास्तीत जास्त डाव्या कुशीवर झोपून मन प्रल्हादकर संगीत ऐकावे.

तसेच प्रसूतीनंतर सुधा काही काळजी घ्यावी जेणेकरून मातेचा किव्वा बाळाचे सुदृढता राखल्या जाईल.

 

 

by  लिना खोंडे