ऑस्टिओपोरासिस

ऑस्टियो म्हणजे हाड व पोरोसिस म्हणजे ठिसूळ होणे. या रोगामध्ये हाडांच्या ठिकाणी ठिसूळता येणे म्हणून या रोगाला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. ऑस्टिओपोटिसिस सर्वसाधारणःकोणालाही होणारा आजार आहे. बदलती जीवनशैली, राहणीमान व आहारात पोशणतत्त्वाची कमी हे या रोगा उत्पत्तीचे मुख्य कारण आहे. जसे जसे वय वाढते तसी-तसी शरीरातील धातुंची झीज होत जाते. या शरीरामध्ये हाडे इतकी कमकुवत व नाजूक होतात की हलकासा  धक्का लागल्याने किंवा मुरगळल्याने किंवा पडल्याने किंवा जड वस्तू उचलल्याने देखील फॅक्चर होवू शकते.

बालवयात हाडांची वाढ होते, तरुण वयात हाडांची घनता वाढून ती टणक बनतात. तर वाढत्या वयाबरोबर शरीराची झीज होत जाते. म्हणजेच सर्व धांतूचा क्षय होत जातो. त्यामध्ये हांडाचा देखील समावेश होतो. हाडांची घनता कमी होते व वयांच्या ३० नंतर जर योग्य काळजी घेतली नाहीतर आपल्याला हा ऑस्टियोपोरोसिस नावाचा रोग होतो.

लक्षणे-

– कंबर हात व मणगटाच्या हाडांमध्ये वेदना असणे.

– मानेमध्ये पाठीच्या कणेत वेदना असणे.

– शरीराला वाक येणे

– उंची कमी होणे

– थोडयाही कारणाने फॅ्रक्चर होणे.

– स्त्रींयामध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषापेक्षा ४ पटीने अधिक असते. याचे मुख्य कारण म्हणजे

आहारतील पोशणतत्त्वाची कमी,शीळे अन्न, खाण्याची पदधत व रजोनिवृत्तिनंतर होणारे हार्मोन्सचे

असंतुलन.

इतर कारणे-

– अनुवांशीकता

– व्यायामाचा अभाव

– बैठी जीवनशैली

– ‘ड’ जीवनसत्त्वाची कमी

– आहारात कॅलशीअमची कमतरता

– धुम्रपान मदयपान तंबाखूचे सेवन

– हाडांचा कर्करोग

– मूत्रल औशधी,स्टेरॉइड्स चे सेवन.

– काही कारणांमुळे शस्त्रक्रिया करुन बीजग्रंथी काढल्याने

निदान

– BMD test बोनडेनसिटी चाचणी

– हेक्झा स्कॅन

– Blood test रक्ताची चाचणी

सीरम कॅल्शीअम, विटामिन डीT3, T4, T5h इस्त्रोजन

उपाय-

आहार हा परिपूर्ण व योग्य मात्रेत घ्यावा. आहारामध्ये सहाही रसाचा समावेश असणे आवश्यक आहे.

हाडांच्या बळकटीसाठी व विकासासाठी परीपूर्ण कॅल्शीयम व विटामीन ‘डी’चे सेवन योग्य मात्रेत घेणे आवश्यक आहे.

आहारामध्ये दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ खजूर, बदाम, डिंक, आळीव, तिळ, नाचणी, मेथीदाणा, हिरव्या पालेभाज्या इ. समावेश असावा.

किमान अर्धातास चालल्याने हाडे मजबूत होतात पेशीमधील रक्तसंचार वाढतो त्यामुळे पेशी मजबुत होतात.

  • नियीमत व्यायम व योगासन करणे.
  • नियीमत आंघोळीच्या एक तास अगोदर व झोपण्या अगोदर सर्व शरीराला तेल लावणे
  • सकाळी अर्धातास तरी कोवळया उनात बसणे

1 comment

  1. टाचेच दुखणे व यात्रेत, चालण्याच्या धावण्याच्या स्पर्धेत - Parijatak

    […] उन्हात फिरल्याने अधिक थकवा येतो. एखाद्यावेळी संधीवातानेही पाय दुखतात. अशावेळी सुंठीचा काढा करावा. त्यात २० ते ३० मिली एरंड तेल टाकावे. हे मिश्रण रात्री झोपताना प्यायल्याने सांधेदुखी विशेषतः संधिवात, आमवातात काही दिवसातच आराम पडतो. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top