अरुची

‘प्रक्षिप्तं तु मुखे चान्नं यत्र नास्वादते नरः|
अरोचकः स विज्ञेयः….

तोंडात घेतलेल्या आहाराची रुची न लागणे ,त्याची चव न कळने हे ज्या व्याधीत असते त्यास अरोचक असे म्हणतात .

आज मुग्धा OPD मध्ये आली असता तिने आपली तक्रार मला सांगितली डॉक्टर मला खूप दिवसापासून जेवणाची चव च कळत नाही आहे .माझ्या आवडीचे सर्व पदार्थ सुद्धा खावयास नको से झाले आहे कारण तोंडाला चव च उलारी नाही आहे .आणि म्हणून गेल्या काही दिवसांपासून माझे वजन हि कमी होत चालले आहे.

कुठलाही पदार्थ तोंडात घेतल्या घेतल्या तो खरात आहे,गोड आहे ,तिखट आहे हे आपणास कळते कारण ‘असे निपाते द्रव्यांनां l इ रसाची व्याख्याच ग्रंथकारांनी केली आहे .

आस्यवैरस्य,विरसास्यता ,भक्तोपघात ,अरुची ,अश्रद्धा ,अनन्नाभिलाषा ,भक्तद्वेष,अभुक्तच्छ्न्द असे अनेक शब्द अरोचक ला समानार्थी म्हणून वापरले जातात .परंतु या सर्वांचा अर्थ आचार्य भोज नि स्पष्ट केला आहे .

अरुची म्हणजे तोंडात रुचकर आहार घेऊनही त्याची चव नीट न कळणे. अन्नाभिलाषा किंवा अनन्नाभिनंद  म्हणजे इच्छित वा आवडीचा पदार्थ खावयास देऊनही खाण्याची इच्छा न होणे. भक्तद्वेष म्हणजे अन्नाचा स्पर्श, दर्शन, गंध इतकेच नव्हे तर त्याचे केवळ स्मरणही नकोसे वाटणे.
अभक्तच्छन्दामध्ये क्रोध, शोक, भय आदी मानसिक कारणांमुळे अन्नावरील इच्छा नष्ट होणे.अश्रद्धा म्हणजे अन्नावर इच्छा नसणे .हि सर्व लक्षणे वेगवेगळी असली तरी यासर्व  लक्षणांचा समावेश आचार्य चरक व सुश्रुतानी आरोचकामध्ये केला आहे .
जरी अरोचक ही व्याधी स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात आढळत असली तरी हि खूप वेळा एखाद्या व्याधी च्या उपद्रव स्वरूपी किंवा लक्षण स्वरूपी अधिक दिसून येते .जसे ज्वर ,राजयक्ष्मा या व्याधी च्या उपद्रव रुपात

अरोचकाची कारणे–

अग्निमांद्य उत्पन्न करणारे करणे जसे अधिक जड आहार घेणे,अति तेलकट –तुपकट खाणे ,अति गोड खाणे इ

योग्य वेळी न जेवणे.

फक्त एकाच प्रकारचे आहार नित्य खाणे
– अति प्रमाणात आहार घेणे.
– विषम आहार घेणे.
– शिळे, नासलेले अशा अन्नाचे सेवन करणे.
– अधिक चिंता करणे

सतत शोक ,भय याने ग्रासित असणे

वरील सांगितलेल्या सर्व कारणाने त्रिदोष प्रकोप घडून येतो त्यामुळे अन्नवह स्तोतासाची दुष्टी घडून येते .आणि  जिव्हेच्या आश्रयाने अरोचक हा व्याधी उत्पन्न होतो .जेह्वा व्याधी अधिक गंभीर होतो तेह्वा तो आपल्यासोबत रसवह स्त्रोतासाची हि दुष्टी घडवून आणतो .परिणामी अन्न खाण्याची इच्छा च होत नाही किंवा अन्न पहाविले सुद्धा जात नाही .अन्न शरीरात न गेल्याने शरीराला व धातूंना पोषण मिळत नाही आणि रुग्ण हा दिवसेंदिवस दुर्बल होत जातो

प्रकार

वातज अरोचक – तोंड तुरट होणे, दात आंबणे. कोणत्याच रसाची चव नीट न कळणे. छातीत दुखल्यासारखे वाटणे.
पित्तज अरोचक – तोंड कडू राहणे, दाह उष्णता, ओष, चोष दुर्गंधीतला यासारखी लक्षणे आढळतात.
कफज अरोचक – तोंड गोड किंवा खारट होते, पिच्छिलता असते. गौरव, शैल्य, विवद्धता ही लक्षणे असतात.
अंगसाद, तंद्रा, शीतावत्रासता (थंडी वाजणे) या प्रकारची लक्षणेही आढळतात.
घास गिळण्यास त्रास होणे असेही लक्षण आढळते.
कफज आरोचकात तोंड गोड किंवा खारट होते म्हणजे साम कफ असल्यास तोंड खारट होते व निराम कफ असल्यास तोंड गोड होते.
सान्निपातिक अरोचक – यात वातादी तीनही दोषांची लक्षणे आढळतात. कषायादी सर्वच रसांचा अनुभव येतो. सार्वदेहिक लक्षणेही सर्वच दोषांची मिळतात. अनेक प्रकारची पीडा असते.
मानसिक अरोचक – शोक , भय, अतित्योभ इत्यादी आगंलु कारणांनी उत्पन्न होणार्‍या या अरोचकात जिभेची चव ही स्वाभाविकच असते, तरीही अरुची हे लक्षण असते.
मानसिक कारण ज्या प्रकारचे असेल, तसा दोषप्रकोप होऊन त्या त्या दोषानुसार लक्षणे उत्पन्न होतात. मानसिक अरोचकामध्ये अरुची बरोबरच अश्रद्धा हे लक्षण प्राधान्य करून असते.
अरोचकामधील उपचार-

अरुचौ कवलग्रहा:धूमा:समुखधावना :l

मनोज्ञमन्नपानं च हर्षणाश्वासनानि च l l

सर्व प्रथम कवळ-गंडूष हे उपक्रम करणे .यासाठी तिक्त निंब ,त्रिफला ,बाबूल ,पटोल इ वनस्पतीच्या काढ्याने सकाळ संध्याकाळ तोंड धुणे .मिठाच्या पाने गुळण्या करणे .

जिरे,काळे मिरे ,कुष्ठ ,सैवर्चल ,बीडलवण ,जेष्ठमध व मोहरीचे तेल एकत्र करून त्यापासून बनविलेली गोळी तोंडात तेवल्यास लाभ मिळतो .
शोधनोपक्रम हे अरुचीमध्ये महत्त्वाचे आहेत.
– शोधन हे बाह्य व अभ्यंतर दोन्ही प्रकारचे हवे.
कवलग्रह वा गंडूषासाठी
– कुष्ठ, साखर, मरिच, बिडलवण, जीरक.
– आवळा, पिप्पली, वेलची, कमळ, उशीर, चंदन.
– लोध्र, तेजोव्हा, हरितभी, त्रिकटू यवक्षार.
– आले, डाळिंब यांच्या स्वरसात जिरे व साखर.
या ४ मिश्रांचा तेल व मध याबरोबर वापर केल्यास अनुक्रमे वातज , पित्तज, कफज व सान्निपातिक आरोचक नष्ट होते.

बाभळीच्या काडीने जीभ स्वच्छ करणे . निंब च्या काडीने दात घासणे ,धुम्पण घेणे या उपायाने देखील लाभ मिळतो .

जेवणामध्ये सुंठ ,आले ,हिंग ,सैधव मीठ ,काळे मीठ ,आमसूल ,मिरे इ वापल्यास जेवणात चव येते .

अभ्यंतर शोधनात वमन ,विरेचन व बस्ती केल्याने लाभ मिळतो .

औषधी कल्पांमध्ये हिंग्वाष्टक चूर्ण, अष्टांग लवण चूर्ण, आस्कर लवण चूर्ण, आमलक्यादि चूर्ण, पंचकोलासव, द्राक्षात्सव, दादिमाडी चूर्ण ,कुमारी आसव, आरोग्य वर्धिनी, लशुनदी वटी, आर्द्रकावलेह, मातुलंगावलेह हे कल्प वापरल्यास लाभ मिळतो .