अम्लपित्त

अम्लपित्त

अम्लपित्त-

अम्लगुणोद्रिक्तं पित्तं अम्लपित्तम् l

या व्याधीमध्ये अम्लगुणाने पित्त वाढत असल्याने या व्याधीस अम्लपित्त असे म्हणतात .पित्त हे दोन प्रकारचे असते प्राकृत आणि विदग्ध .पित्त प्रकुतावस्थेत कटू रसाचे असते तर विदग्ध किंवा सामावस्थेत हे अम्ल रसाचे असते .नि म्हणूनच जेह्वा विदग्ध पित्ताची वृद्धी शरीरामध्ये घडून येते तर साहजिक रित्या अम्ल गुण वाढायला लागते आणि अम्लपित्त व्याधीची निर्मिती होते .

अम्लपित्त हा व्याधी जरी दिसायला सोपा असला तरी हा एक चिरकाल व्याधी अंतर्गत मोडणारा व्याधी आहे कारण अनेक दिवस हेतू घडत राहून याची संप्राप्ती हळू –हळू घडत असते त्यामुळे हा व्यक्त हि बराच कालांतराने होते आणि याचे कारणाने याची चिकित्सा हि चिरकालीन ठरते .

हेतू –

‘विरुद्धदुष्टाम्लविदाहीपित्तप्रकोपिपानान्नभूजो विदग्धम् l

पित्तं स्वहेतूपचीतं पुरा यत्तदम्लपित्तं प्रवदन्ति सन्त: l l

वर्षाऋतू अध्ये आधीच पित्त दोषाचा संचय झालेला असतो अश्या वेळी विरुद्ध अन्न ,दुष्ट भोजन ,अतिशय आंबट –विडाही आणि पित्त प्रकोपक आहार घेतल्याने संचित असलेला पित्त अधिक विदग्ध होतो आणि अम्लापित्ताची निर्मिती करतो .

याशिवाय अधिक मसालेदार ,तिखट –आंबट पदार्थ ,जळजळीत ,अधिक उष्ण आणि अधिक तेलकट –तुपकट पदार्थ ,अतिशय रुक्ष आणि द्रव पदार्थ किंवा शिळे नसलेले पदार्थ अधिक सेवन केल्याने

अभिष्यांदि पदार्थ ,अम्बाविलेले पदार्थ (इडली ,डोसा ),दही ,ताक ,भाजेले धन्य वरी-नाचणी सारखी धान्य ,मद्य इ अधिक सेवन केल्याने

मल-मुत्र यांचे वेग धारण करणे ,खूप उपवास काराने ,जेवण झाल्यावर परत जेवणे ,जेवणानंतर तुरंत झोपणे ,जेवणं करतांना खूप पाणी पिणे ,गरम पाण्याने फार वेळ स्नान करणे ,रात्रीला अधिक जागरण करणे या सर्व कारणाने पित्त विदग्ध होऊन अम्लापित्त हा व्याधी निर्माण होत असतो .

आम्लपित्त मध्ये तिह्नी दोष प्रकुपित होऊन अग्निमांद्य निर्माण होतो ,आणि अग्निमांद्य असताना जर वरील सर्व हेतू किंवा एक हेतू जरी घडत असला तरी ,या अपथ्या ने अन्न अधिक अधिक विदग्ध होत जातो आणि त्यामुळे पित्ताचा अम्ल गुण वाढतो ,त्यामुळे खालेल्ल्ये अन्न शरीरामध्ये आंबायला लागते .या आंबलेल्या अन्नाने पित्त अधिकच विदग्ध होतो आणि अमाशायाचा क्षोभ होण्याची सुरुवात होते .शरीरामध्ये हे विष चक्र सतत चालूच राहते .ज्या प्रमाणे दह्याच्ये भांडे साफ न करतात त्याच भांड्यात दुध घेतल्यास दुध अंबायला लागते त्याच प्रमाणे आमाशायातील विदग्ध पित्ताच्या उपस्थी तीने  घेतलेला साधा आहार हि विदग्ध होतो परिणामी अमाशायाचा क्षोभ होऊन आमाशयाची दुष्टी होऊ लागते .

अम्लापित्ताची लक्षणे –

‘अविपाकक्लमोत्क्लेशतीक्ताम्लोदगारगौरवै: l

हृत्कंठदाहरुचीभिश्चाम्लपित्तं वदेदभिषक् l l

घेतलेले अन्न न पचणे ,थोडेशे हि खाल्ले असता श्वास भरून येणे ,अन्न वर आल्याप्रमाणे वाटणे ,आंबट-कडू ढेकर येणे ,छातीत जळजळ होणे ,गळ्यात आग होणे ,अरुची हि लक्षणे दिसतात .

त्याच प्रमाणे  पोटात दुखणे ,डोके दुखणे ,हृदयाच्या ठिकाणी शिलका मारणे ,पोटात फुगारा येणे ,अंगावर काटे येणे ,संडासाकडे पातळ होणे हि पान लक्षणे अम्लापित्तात दिसून येतात .

प्रकार-

अम्लापित्ताचे २ प्रकार आहेत .

ऊर्ध्वग  अम्लपित्त-

यामध्ये कफाचा अनुबंध असतो .उलट्या होतात .उलट्यातून बाहेर पडणारे द्रव्य हे हिरवे ,पिवळे ,निळे किंवा काळ्या रंगाचे असते .हि उलटी कडू किंवा आंबट स्वरुपाची असते .उलटी सोबत डोके पण खूप दुखते .उलटी झाल्यावर रुग्णाला बरे वाटते .

अधोग अम्लापित्त –

यामध्ये रुग्णाला हिरवी –पिवळी –काळी आणि रक्त वर्णाची पातळ अशी मलप्रवृत्ती होते .त्याच बरोबर खूप तहान लागणे ,जळजळ होणे ,चक्कर येणे ,डोळ्यासमोर अंधारी येणे ,अंगावर शीत –पित्त उमटणे हि लक्षणे दिसून येतात .द्रवमल प्रवृत्ती नंतर रुग्णाला बरे वाटते .

जर आम्लपित्ताची वेळेवर चिकित्सा नाही केली तर त्याच्या उपद्रव स्वरुपात अनेक व्याधी निर्माण होतात .वारंवार ताप येणे ,अतिसार ,पांडू ( रक्ताल्पता ),शूल ,शोथ (सूज),भ्रम ,व धातुक्षीणता इ उपद्रव स्वरूप निर्माण होतात.

चिकित्सा –

आम्लपित्त हा व्याधी आमाशयसमुद्भभव व्याधी आहे नि यामध्ये मुख्यत: कफ-पित्ताची दुष्टी असते त्यामुळे वमन व त्या नंतर मृदू विरेचन केल्यास खूप लाभ मिळतो .वमनासाठी तिक्त द्रव्य म्हणजे पटोल ,निंब ,मदन्फल क्वाथ यांचा वापर करावा तर विरेचानासाठी अविपत्तिकर चूर्ण ,त्रिफळा चूर्ण ,निशोत्तर चूर्ण यांचा वापर करावा .

दोषांचे वमन-विरेचानाने शोधन झाले कि नंतर शमन चिकित्सा करावी .शमन चिकित्सेत सर्व प्रथम लंघन करावे नंतर लघु भोजन आणि तिक्त रसात्मक अश्या पचन द्रव्याचे कल्प वापरावेत .यासाठी गुडूची ,भूनिंब ,चीरायता यांचे कल्प वापरल्यास विशेष लाभ मिळतो .

अम्लापित्तात द्रव गुणाने वाढलेली समता कमी करण्यासाठी ग्राही औषधींचा वापर करावा यासाठी शंख भस्म ,प्रवाळ पंचामृत ,कपर्दिक भस्म ,सुंठी ,ताक ई वापर केल्यास लाभ मिळतो .तर पित्ताची विदग्धता कमी करण्यासाठी कामदुधा ,सुवर्णमाक्षिक ,वंग भस्म ,सुतशेखर इ वावरावेत .शतावरी सुद्धा पित्ताची विदग्धता कमी करते म्हणून शतावरी चे विविध कल्प जसे शतावरी मंडूर ,शतावरी कल्प ,शातावार्यादी काढा वापरल्यास लाभ मिळतो .

अम्लापित्तात असणारा दह व जळजळ कमी करण्यासाठी औदुंबरावलेह ,कुष्मांडअवलेह ,दादिम्बावलेह ,आद्रकावालेह यांचा चांगला उपयोग होतो .

याशिवाय भूनिम्बदि काढा ,गुडूच्यादी काढा ,पटोलादि काढा ,अभयारीष्ट यांचा वापर करावा .अम्लापित्तामध्ये क्षुधावर्धन झाल्यावर घृतपान द्यावे यासाठी तीक्तक घृत ,महातीक्तक घृत ,शतावरी घृत ,द्राक्ष घृत यांचा वापर करावा .

पथ्यापथ्य –

अम्लापित्त हा मुख्यत: अग्निमांद्य मुले होतो म्हणून यामध्ये  पथ्यापथ्यास विशेष महत्त्व दिले आहे .जर पथ्यापथ्य कटाक्षाने पाळले तर जीर्ण असलेला अम्लापित्त हि बरा करता येतो .म्हणून आहार हा नेहमी हलका व लघु घ्यावा .

आहाराची वेळ पाळणे ,आहारामध्ये जुने तांदूळ ,मध ,पांढरा भोपळा ,पडवळ ,भेंडी ,दुधी भोपळा ,डाळिंब ,दुध यांचा समावेश करावा .

तील ,उडीद ,कुळीथ ,लसून ,आंबट –कडू पदार्थ ,दही ,तेलकट –तुपकट पदार्थ ,अम्बविलेले पदार्थ वर्ज्य करावेत .जेवणानंतर तुरंत झोपणे टाळावे .

ज्यांना नेहमी आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांनी सकाळी उपाशी पोटी सालीच्या लाह्या खायाव्यात .

रोजच्या आहारात गायीच्या साजूक तुपाचे वापर असावेत .

सकाळी सूर्य नमस्कार ,प्राणायाम ,दीर्घ श्वसन यांचा अभ्यास नियमित करावा.

अम्लापित्तावर घरगुती उपचार –

आमसूल शरबत रोज पिल्याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो .

ज्येष्ठमध पावडर १/२ चम्मच दिवसांतून दोन वेळा दुधाबरोबर घेणे

जेवल्यानंतर १/२ चमचा बडीशेप खाणे .

रात्री झोपताना गार केलेले दुध शतावरी चूर्ण टाकून घेणे .

पाव चमचा सुंठ ,पाव चमचा आवळा चूर्ण आणि अर्धा चमचा खडीसाखर घालून साकार संध्याकाळ घेताल्य्ने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो .

७-८ मानुक्का दुधात भिजवून खाडी साखरे बरोबर घेतल्यास पित्ताचा होणारा दह कमी होतो .

वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास रोज सकाळी गुलकंद उपाशी पोटी घेतल्यास लाभ मिळतो

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top