अतिरक्तदाब (Hypertension)

वयाची ४० शी आली कि व्यक्ती अनेक व्याधींनी ग्रस्त होतो .मधुमेह ,अतिरक्तदाब ,हृदयरोग ,वातविकार इ रोग आज फमिली मध्ये एक ना एक व्यक्ती ला झालेला असतो .आज मला अतिरक्तदाब या विषयावर बोलावयास वाटत.Hypertension

अतिरक्तदाब या नावातच या रोगाचे स्वरूप आहे .रक्त अति झाल्यामुळे राक्तावाहीण्यावर पडलेला भार म्हणजे अतिरक्तदाब .

अतिरक्तदाब होण्यानीची मुख्य कारण म्हणजे चुकीची आहार शैली ,व्यायामाचा अभाव ,अनिद्रा ,मानसिक तान ताणाव .अतिरक्तदाब मुळे रक्तवाहिन्या कठोर बनतात ,त्यातील लवचिकता कमी होते ,आहारातील अति मीठ ,पाणी मुळे रक्तातील द्रव पाधार्थ वाढतात त्या रक्तातील दाब वाढतो व उच्च रक्तदाबाची निर्मिती होते .रक्तदाब अधिक वाढल्यामुळे रक्तवाहिन्या फुटतात व रक्ताची गुठळी तैयार होते .हि गुठळी मेंदू मध्ये जाऊन अडकल्यास पक्षाघात होतो ,तसचे हृदय गत रक्तवाहिनीत अडकल्यास heart attack येतो.रक्त वाहिनी मधील दाब अधिक वाढल्यामुळे हृदयावर दाब वाढतो ,हृदयाचे आकारमान वाढते व त्याला hypertensive heart disease असे म्हणतात .या उच्च रक्तदाबाचा परिणाम डोळे ,किडनी ,लिवर या सारख्या अवयवावर होतो .परिणामस्वरूपी कमी दिसणे ,पचन संस्थे चे विविध विकार ,किडनी चे विकार निर्माण होतात.या वरून हे स्पष्ट होते कि रक्तदाब हा शरीर साठी किती घटक आहे .अतिरक्तदाब हा घातक असला तरी त्यावरीच उपचार हे तेव्हडेच सोपे आहे .

रक्तवाहिनी ची लवचिकता वाढविणे व दुसरे म्हणजे रक्तातील द्रव पदार्थ कमी करणे हे त्याचे चिकित्सा सूत्र

व्यायामामुळे रक्तवाहिनी ची कठोरता कमी होते ,शरीरात असे काही रासायनिक घटक तैयार होतते ज्या मुले रक्तवाहिन्या लवचिक बनतात .रक्तवाहिन्या मजबूत बनतात ,रक्तवाहिनीतील चिकटलेले चरबीयुक्त पदार्थाचे क्षणः न होते .

रक्तातील द्रव पदार्थ बाहेर काढण्या करिता आधुनिक शास्त्र diretics ची योजना करतात .आयुर्वेद मध्ये देखील आचार्यांनी मुत्राल औषधाची मांडणी केली आहे .पुनर्नवा ,गोक्षुर या सारख्या औषध चा वापर अतिराक्तादाबावर केला जातो .

शरीरातील पाणी कमी करण्यासाठी स्वेदन या पूर्व कर्माचा देखील उपयोग होतो पण मात्र कधी कधी अति उष्णतेमुळे देखील रक्तदाब वाढू शकतो म्हणून चिकित्सकाच्य परीक्षणं नंतरच चिकित्सा करावी .

विरेचानाने देखील fluid retension होतो तसेच विरेचन हे पित्तावरील उपक्रम आहे ,पित्त व रक्ताचा संबंध असतो म्हणून विरेचानाने रक्त दुष्टी कमी होते

हल्ली च्या युगात स्पर्धा वाढली आहे त्यामुळे मानसिक ताण तणाव ,अनिद्रा याचे प्रमाण वाढले आहे यामुळे देखील रक्तदाब वाढतो अश्यावेळी पंच्कार्मामधील शिरोधारा हि चीकीत्स्ता कामी पडते .शिरीधारेने वाताचे शमन होते पर्यायी मन शांत होतो व झोप चांगली यायला लागते.

राक्तामोक्षानाने रक्तातील अपद्राव्या म्हणजे toxins बाहेर काढल्या जाते व रक्तदाब कमी केल्या जाते.

बस्ती ला अर्ध्या चीकीत्स्ता असे म्हणतात .म्हणजे निर्मित होणारया ५०% रोग केवळ बस्ती या चिकित्सेने बरे करता येतात .एवडे महात्म्य बस्तीचे .

पुनर्नवा ,गोक्षुर ,रुद्राक्ष ,सर्पगंधा ई  द्रव्याच्या क्वाथाची बस्ती उच्च रक्तदाबावर कार्य करणारी आहे.

आहारा मध्ये योग्य बदल करूनही रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येतो .लोणची ,पापड ई पदार्थ न खाणे ,fermented पाधार्थ न खाणे,आहारात तिखट कमी घेणे ,विविध चटण्या न घेणे .पाणी दिवसातून फक्त २-३ lit घेणे. विहारमध्ये व्यायाम व प्राणायाम नियमित करणे .प्राणायाम मुले शरीरातील oxygen चे प्रमाण वाढते व मानसिक ताण देखील कमी होतो .व रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

व्याधी मोठा असला तरी उपाय सोपे आहे फक्त गरज आहे तुमच्या प्रतिसादाची !