अजीर्ण

अजीर्ण

अजीर्ण –

आज आयुर्वेदाची प्रक्टीस करत असताना रोज च्या ओ पी डी मध्ये एक तरी रुग्ण हा अजीर्ण झाल्याची तक्रार घेऊन येतो .

‘न जीर्याती सुखेनान्नं विकारान् कुरुतेsपि च l

तदजीर्णामिती प्राहुस्तन्मुला विविधा रूज: l l

घेतलेल्या आहाराचे अचान सम्यक न होणे म्हणजे ते अपक्व अवस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय .व हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांना जन्म देणारे ठरते .

अजीर्ण ची कारणे –

सामन्यात: आहारातील विषमतेमुळे अजीर्नाची उत्पती होते.आयुर्वेदामध्ये आहार अ किती घ्यावा ,कसा घ्यावा ,कुठल्या रामाने घ्यावा ,,कस्य पद्धतीने बनून घ्यावा या बाबातीचे सविस्तर वर्णन केले आहे पण वेळे अभावी आहारसंबधी कुठले हि नियम पाळल्या जात नाही.

पुष्कळ लोक फक्त एकदाच ना बनवितात व ते फ्रीज मध्ये ठेऊन वारंवार गरम करून खाल्या जाते कारण आई व वडील हे डोह्नी काम करत असल्याने अन्न बनविण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ पुरात नाही .

आज जेवणामध्ये preservative युक्त पदार्था चे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्यातील पोष्टिकता किती असते हे कोणास ठाऊक ?

सिंह मागे लागले आहे कि काय अश्या परीस्थित अपान जेवण करतो म्हणजे जेवण नं चावता फक्त गीलाण्याचे च काम आपण करत असतो .चार्वानाचे काम नीट न झ्याल्याने त्यावर क्लेदक कफाची क्रिया पण नीट होत नाही परिणामी अन्न अपक्व राहतो .

घाई गडबडीने जेवण केल्याने जेवण हे अपेक्षे पेक्षा अधिक जाते ,टी व्ही पाहून जेवण केल्याने देखील मनाचा जेवणाशी काहीच संबध घडून येत नाही व अन्नाहि पचन क्रिया मंदावते .

आज अपान हॉटेल मध्ये जाऊन कच्चे ,कमी शिजलेले, अधिक मसाले युक्त पाठर्थ फक्त जिभेला चाविस्कर वाटत आहे म्हणून खात जातो.त्यानंतर शेवटी स्वीट डिश म्हणून आईस्क्रीमआ,रबडी जिलेबी इ पाठर्थ खातो .या च्या परिणामस्वरूपी शरीरातील कफ दोष वाढतो व हे वाढलेले कफ जठराग्नी मंद करतो .

हल्ली सर्व साधारणत : रात्री चे जेवण हे उशिरा होते त्या नंतर अपान मस्त पैकी सोफ्यावर आडव होऊन मालिका पाहत असतो किंवा मोबाईल वर बसून काही तरी करत असतो .त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही .हे अन्न पोटात असेच पडून राहते परिणामी शौचालं साफ  होणे ,पोटात फुगारा येणे हि लक्षणे दिसून येतात .

नैराश्य ,दुख ,चिंता ,राग ,भीती या सारख्या भावनांमुळे देखील घेतलेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही .

या शिवाय वेगचे धारण करणे ,रात्री कामाचा अधिक बोझा असण्याने मध्य रात्री पर्यंत जागरण करणे, दिवसा झोपणे ,भूक लागली नसताना देखील गरम सामोसा किंवा भजी पाहून केवळ जिभेच्या मोह पायी खाणे या सर्व कारणाने जठराग्नी ची दुष्टी होते व अजीर्णा ची सुरुवात शरीरात होऊ लागते .

मी सांगितलेली करणे हि प्रतेकासोबत रोजच घाटात असते .बरोबर कि नाही ? असो-

अजीर्णाची लक्षणे –

‘ग्लानीगौरव विष्टंभ भ्रममारुतमूढता :l

विबंधो वा प्रवृत्तीर्वा सामान्यजीर्णलक्षणम् l l

भूक न लागणे ,तोंडास चव नसणे ,उदर गौरव ,आध्मान ,मलप्रवृत्ती ग्रथित किंवा द्रव मल असणे ,छर्दी,उदर शूल हि अजीर्नाची मुख्य लक्षणे आहे .

प्रकार –

आमाजीर्ण – प्रकुपित कफामुळे उत्पन्न होणारे अजीर्ण .कफा वाढल्यामुळे अमाशायातील क्लेदक कफ वाढतो .कफातील जलीय अंशाने अग्नीची तीक्षणता कमी होते परिणामी पाचक पित्ताची मात्र कमी होते आणि अग्निमांद्य होऊन अजीर्ण उपन्न होतो .

आमाजीर्ण असल्यास कफ वाढतो व थोडसेही खाल्ले तरी पोटजड होते. रुग्णास अम्लरहित अशा किंव ज्या प्रकारचे अन्न घेतले त्याचा रस ,गंध असलेल्या ढेकर अति प्रमाणात येणे ,त्वचा व मल यांना स्निग्धता असणे ,सर्व शरीरात खाज हि लक्षणे दिसून येतात .

विदग्धा जीर्ण –प्रकुपित पित्तामुळे होणारे अजीर्ण .पित्ताचा द्रव गुण वाढ्यल्याने अग्निमांद्य निर्माण होते .घशाशी आंबट,तिखट ,कडवट येणे ,पोटात व छातीत जळजळ वाटणे ,नेत्रदाह ,स्वेद अधिक येणे ,भ्रम ,मूर्च्छ हि लक्षणे दिसून येतात .

विष्टब्धाजीर्ण – प्रकुपित झालेल्या वायू मुले सर्वच पाचक स्त्रावांची उत्पत्ती व उदिरण योग्य प्रकारे होऊ शकत नाही .या प्रकारात वायू व पुरीष यांचा अवश्तंभ होतो .यविविध प्रकारच्या वेदना, आध्यान, डोकेदुखी, अंग दुखणे ,कटी-पृष्ट वेदना अशी लक्षणे दिसतात.

रसशेषाजीर्ण –घेतलेल्या आहाराच्या बहुतांश भागाचे पचन पूर्ण झाल्या नंतरही आहार द्रव्यांचा काही भाग महास्त्रोतासामध्ये अपचीत अश्या स्वरुपात राहतो यालाच रसशेषाजीर्ण असे नाव दिले जाते .“““““`

अजीर्णामध्ये घ्यायाची काळजी व उपचार
अजीर्ण झाले असता, सर्वप्रथम खाल्लेले अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत उपाशी रहावे. नंतर जसजसा अग्नी वाढेल, भूक लागेल त्याप्रमाणात, विविध प्रकारचे पेया विलेपी ,यूष ,ताक घेणे .

जेवणाच्या वेळा चुकवू नये. दुपारचे जेवण १२-१  च्या दरम्यान व रात्री शक्यतो ६-८  च्या मध्ये जेवण करावे .भूक नसल्यास जेवणापूर्वी आल्याच्या तुकड्यावर सैंधव घालून चघळावा.  अन्न पूर्णत: शिजवूनच खावे.

जमत असल्यास आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. पोटाला पूर्ण विश्रांती द्यावी. जेवताना शांत चित्ताने, एकाग्रतेने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ताटातल्या जेवणावर भरपूर प्रेम करावे.

औषधी द्रव्यांमध्ये त्रिटकू, पंचकोल, शंखवटी, हिंग्वाष्टक चूर्ण, आमपाचक वटी, भास्कर लवण उपयुक्त ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top